नांदेड परिमंडळातील ८२७ थकबाकीदारांना शॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

0- नऊ कोटी ९५ लाखाची वसुली
0- एक लाख ३७ हजार २३५ वीज ग्राहक
0- १३९ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी
0- सर्वाधिक थकबाकी परभणी मंडळाची

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळांतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीजग्राहकांकडे अनेक दिवसांपासून थकीत असलेल्या वीजबिलाची वसुली मोहिम एक डिसेंबर पासुन पुन्हा जोमाने सुरु करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसात ८२७ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून नऊ कोटी ९५ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली आहे.

 

परिमंडळातील घरगुती, व्यवसायिक  व औद्योगिक लघुदाब वर्गवारीतील एक लाख ३७ हजार २३५ वीज ग्राहकांकडे १३९ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी ही परभणी मंडळामध्ये आहे. परभणी विभाग क्रमांक एक मधील २१ हजार ५५४ वीज ग्राहकांकडे ४३ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर परभणी विभाग क्रमांक दोन कडील ३१ हजार ३०२ वीज ग्राहकांकडे ६९ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकबाकीचा डोंगर कायम

नांदेड मंडळातील ५९ हजार ३८५ वीजग्राहकांकडे १६ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये भोकर विभागातील १४ हजार ८३२ वीज ग्राहकांकडे तीन कोटी १४ लाख रुपये, तर देगलूर विभागातील १९ हजार २६४ वीज ग्राहकांकडे पाच कोटी आठ लाख रुपये, नांदेड शहर विभागातील १५ हजार १४८ वीज ग्राहकांकडे सहा कोटी ४३ लाख, त्याचबरोबर नांदेड ग्रामिण विभागातील १० हजार १४१ वीज ग्राहकांकडे एक कोटी ५९ लक्ष रुपये थकबाकी आहे. त्याचबरोबर हिंगोली मंडळातील २४ हजार ९९४ वीजग्राहकांकडे नऊ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकबाकीत परभणी मंडळ अव्वल 

एक डिसेंबर पासुन सुरु केलेल्या वसुली मोहिमेत परभणी मंडळातील ६५० वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे, तर नांदेड मंडळातील १५४ वीजग्राहकांचा वीज पुवठा खंडीत केला आहे.  त्याचबरोबर हिंगोली मंडळातील २३ वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. अशा प्रकारे केवळ पाच दिवसात नांदेड परिमंडळातील ८२७ वीज पुरवठा तात्पुरत्या व कायमस्वरुपी प्रकारात खंडीत करण्यात आला आहे.

आता नोटीस देखील एसएमएसव्दारे 

मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या वीजग्राहकांना महावितरणकडुन मीटर रिडींगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसव्दारे पुर्व माहिती देवून केले जात आहे. या सोबतच वीजबिलाची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदीच्या माहितीसह वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश एसएमएस व्दारे वीज ग्राहकांना पाठवला जात आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्या नंतर नियमाप्रमाणे नोटीस देखील एसएमएस व्दारे दिली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shock to 3 outstanding persons in Nanded area