आजी माजी पालकमंत्र्यांना मतदार संघातच हादरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

बीड : ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि माजी पालकमंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्या मतदार संघात मोठा हादरा बसला. पंकजांच्या परळी तालुका आणि मतदार संघात नऊ पैकी केवळ एक जागा भाजपला जिंकता आली. तर बीड तालुक्यात राष्ट्रवादीला आठ पैकी एकही जागा जिंकता आली नाही.

बीड : ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि माजी पालकमंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्या मतदार संघात मोठा हादरा बसला. पंकजांच्या परळी तालुका आणि मतदार संघात नऊ पैकी केवळ एक जागा भाजपला जिंकता आली. तर बीड तालुक्यात राष्ट्रवादीला आठ पैकी एकही जागा जिंकता आली नाही.

गुरुवारी (ता. २३) दुपारपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांतील निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीचे निम्मे निकाल हाती आले. राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघ परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील अर्धा भाग असा विस्तारलेला आहे. यामध्ये परळी तालुक्यात सहा तर अंबाजोगाई तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. 

यामध्ये सहा जागांवर राष्ट्रवादी तर दोन ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. या ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने लढली होती. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 
तर बीड मतदार संघातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही. बीडमध्ये क्षीरसागर यांचे पुतणे सभापती संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीने तीन जागा जिंकल्या. 

अंबाजोगाई तालुक्यातील अंतिम निकाल

पंचायत समिती
 अंबाजोगाई पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून १२ पैकी ७ जागा राष्ट्रवादीला तर भाजपला ३ आणि काॅग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. 

पं.स. गणातून विजयी उमेदवार : 
साकुड - चामनर कडाबाई (राष्ट्रवादी)
 जोगाईवाडी - भिसे अनिता (राष्ट्रवादी) 
जवळगाव - सावंत रखमाजी (राष्ट्रवादी)
 घाटनांदूर - वालेकर मच्छिंद्र (राष्ट्रवादी)
पट्टीवडगाव - गित्ते बिभीषण (भाजप) 
उजनी - भताने मीना (राष्ट्रवादी) 
बर्दापूर - कोकरे सरस्वती (भाजप) 
सायगाव - पटेल अलिशान (राष्ट्रवादी)
 चनई - केंद्रे सतिष (भाजप) 
लोखंडी सावरगाव - देशमुख तानाजी (राष्ट्रवादी) 
राडी - जगताप विजयमाला (काँग्रेस) 
पाटोदा म. - ढगे विठ्ठल (काँग्रेस) 

जिल्हा परिषद
 अंबाजोगाई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा पैकी ३ जागा राष्ट्रवादीकडे तर २ भाजपला आणि १ काँग्रेसला मिळाल्या आहेत.

जि.प. गटातून विजयी उमेदवार

जोगाईवाडी - शेप जयश्री (राष्ट्रवादी)
 घाटनांदूर - सिरसाट शिवकन्या (राष्ट्रवादी)
पट्टीवडगाव - गिराम संजय (भाजप) 
बर्दापूर - मोरे अविनाश (भाजप)
 चनई - उबाळे शंकर  (राष्ट्रवादी) 
पाटोदा म. - देशमुख राजेसाहेब (काग्रेस)

Web Title: shocker to pankaja munde, Jaydutt Kshirsagar