esakal | धक्कादायक : अतिवृष्टीने उदगीरात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या उदगीर.jpg

गेल्या दोन दिवसापूर्वी उदगीर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घातलेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शुक्रवारी (ता.१६) वाढवणा (खु) येथील तर शनिवारी (ता.१७) करखेली येथील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

धक्कादायक : अतिवृष्टीने उदगीरात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : गेल्या दोन दिवसापूर्वी उदगीर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घातलेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शुक्रवारी (ता.१६) वाढवणा (खु) येथील तर शनिवारी (ता.१७) करखेली येथील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे यावर्षी पेरणीपासून संकट निर्माण झाले आहे. अनेक भागात दोन वेळा तर काही भागात तीन वेळा पेरणी करावी लागली.तरीही सोयाबीन, उडीद, मूग चांगल्या स्थितीत असताना अतिवृष्टीचा पाऊस झाला. त्यानंतर काढणीच्या वेळी गेल्या दोन दिवसापूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे हाताला आलेले सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. काढलेल्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात भिजून, वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे अस्मानी संकट आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या परिस्थितीला धास्तावलेले वाढवणा (खू) (ता. उदगीर) येथील शेतकरी गोपीनाथ मद्देवाड (वय ६८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांना तीन एकर शेती आहे. यावरच त्यांच्या घराची रोजीरोटी चालते. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने त्यांचा घात केला. लोकांची देणी कशी द्यावी? कारण हातात आलेले पिक पावसानं हिरावलं. यामुळे शेतातील झाडाला गळफांस घेत त्यानी जीवनयात्रा संपवली आहे. या बाबत वाढवणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याच परिस्थितीमुळे करखेली (ता. उदगीर) येथील शेतकरी प्रल्हाद नागनाथ राठोड (वय-६५) यांनी शनिवारी (ता.१७) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घराशेजारील बाबळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यांच्या मृत्यूची शासन दरबारी व पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती करखेलीचे ग्रामस्थ राजकुमार बिरादार यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधीने फिरवली पाठ

एरवी मतासाठी व इतर स्वार्थासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर फिरणारे सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी मात्र या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरवले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर आलेल्या संकटात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याचे औदार्य कोणत्याही लोकप्रतिनिधी कडे सध्यातरी दिसून येत नाही.
 

(संपादन-प्रताप अवचार)