Video : धक्कादायक... महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले

tanmsa chori.jpg
tanmsa chori.jpg


तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः कोळगाव (ता. हदगाव) येथे अज्ञात पाच ते सात चोरट्यांनी घरातील महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा अंदाजे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. २०) मध्यरात्री घडली.

>चोरट्यांच्या हातात लाकडे व लोखंडी अवजार
येथील रहिवाशी सुभाष पवार हे आपल्या कुटुंबीयांसह घरी झोपले होते. चोरट्यांनी घरामागील बाजूंनी घरात प्रवेश करून पवार यांच्या झोपलेल्या पत्नीचा गळा दाबला व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. या प्रकारामुळे कमलबाई सुभाष पवार भेदरून गेल्या होत्या. पाच ते सात चोरटे त्यांच्यासमोर उभे होते. त्यांच्या हातात लाकडे व लोखंडी अवजार होती. सर्वांनी आपले चेहरे झाकले होते. चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यातील रोख रक्कम ७५ हजार रुपये व सोन्याचे दागिने घेतले.


घटनास्थळी श्वान पथकाला केले पाचारण
पवार यांनी आठ दिवसांपूर्वी विकलेल्या बैलजोडीचे पैसे कपाटात ठेवले होते. घरातील खोल्यांचे दरवाजे अलगद बाजूला करणे, मानसे जागी होऊन मागे धावणार नाहीत म्हणून घरातील दरवाजांना धान्याने भरलेली पोती लावून बंद करणे, असे प्रकार चोरट्यांनी केले. पण चोरटे घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच कमलाबाईंनी नवऱ्याला उठविले. चोरट्यांनी सुभाष पवार यांच्या दिशेने दगडफेक करीत त्यांना पाठलाग करण्यापासून रोखले व घरामागे शेताच्या परिसरातून पसार झाले. चोरट्यांनी दोन पिशव्या शेतात फेकून दिल्या. हा प्रकार गावभर कळाल्यानंतर सारा गाव घटनास्थळी जमला. ग्रामस्थांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनाही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाची पोलिस उपाधीक्षक बी. मुदिराज, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले होते. या घटनेमुळे गाव व परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास बिट जमादार सुनील सूर्यवंशी हे करीत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com