मंजरथ ग्रामस्थांचे शोलेस्टाईल आंदोलन 

The Sholay style Movement In Manjarath Village
The Sholay style Movement In Manjarath Village

माजलगांव (जि. बीड) : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीला ग्रामसेवक द्यावा व सरपंचांनी कायमस्वरूपी गावात रहावे या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 11) टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंच मनमानी करभार करतात. त्यामुळे गावकऱ्यांचे कोणतेच काम होत नाहीत व गावाला ग्रामसेवकही नसल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आंदोलने, उपोषण करूनही दखल घेतली जात नाही व गावात नियमित सरपंच व तात्काळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्ञानेश्वर वाघमारे, भिमराव कदम, पाडमुख भगवान, राजरतन डोंगरे, दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे, तुकाराम चोरमले, संदिपान डोंबाळे, संतोष वाघमारे, तात्याभाउ थोरात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com