रस्त्यांवर थाटली चप्पल- बुटांची दुकाने

nanded
nanded

नांदेड : नांदेड शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर विविध प्रकारच्या व मनमोहक अशा चप्पल व बुटांची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटली आहेत. या दुकानांवरून गरीबांसह श्रीमंत व नोकरी करणारा वर्ग खरदीसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम शहरातील मुख्य दुकानांवर पडत असल्याने दुकानदार चिंतातूर झाला आहे. 

नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून अनेक लहाण- मोठी दुकाने, हॉकर्स व फेरीवाल्यांचा गराडा आहे. मोठ्या शोरूम सर्वसामान्य ग्राहकांसह श्रीमंतानाही परवडणारे नसल्याने ग्राहक हा रस्त्यावर थाटलेल्या दुकानावरून खिशाला परवडेल अशा वस्तु सहज खरेदी करीत आहेत. भांडी, कपडे, तयार कपडे, सोफा, खुर्ची, मेज, पलंग, दिवान, कपाट यासह आदी वस्तूंचे दुकाने रस्त्याच्या कडेला थाटले जात असतानाच आता तर सर्वत्र चप्पल- बुटांचे दुकान सर्व सामान्य गार्हकांना परवडेला अशी थाटण्यात आली आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून मोठ- मोठी शोरूम दुकानदारांनी थाटली आहेत. मात्र रस्त्यावर दुकाने थाटण्यासाठी महापालिकेकडे नाममात्र शुल्क भरून आपली दुकान आपल्या मर्जीप्रमाणे चालविता येत असल्याचे चित्र सध्या नांदेड शहराच्या कोणत्याही रस्त्याने गेलात तर आपल्या लक्षात येईल.

शहराच्या विमानतळ रोड, वर्कशाॅप काॅर्नर, आसना बायपास, छत्रपती चौक, लातूर फाटा, बाफना टी पॉईन्ट, महाराणा प्रताप चौक, शिवमंदीर परिसर चैतन्यनगर, जुना कौठा नाका, डी मार्ट परिसर, नवीन कौठा परिसर, सिडको, हडको आदी भागात ही चप्पल- बुटांची दुकाने आपल्या नजरेत पडतात. दिडशे रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत चप्पल- बुट ग्राहकांना विक्री केल्या जातो. या दुकानांचा थेट परिणाम शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांवर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. भविष्यात अशीच दुकाने रस्त्यावर थाटली तर शोरुमचालक चिंतेत दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com