जालन्यात अँटीसेप्टिक लिक्विडचा तुटवडा 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक जण वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. त्यामुळे प्राथमिक सुरक्षेचे उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझरसह घरात साबणासह अँटीसेप्टिक लिक्विडची मागणी वाढली आहे. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात नावाजलेल्या कंपन्यांचे अँटीसेप्टिक लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ता.१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.  त्यात डॉक्टरांकडून सतत हात धुणे, खोकताना, शिंकताना तोंडाला मास्क लावणे, गर्दीत न जाणे, विशिष्ट अंतर ठेवूनच दुसऱ्या व्यक्तीशी बोलणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासंदर्भात सल्ला दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक जण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आहेत,

घरोघरी नावाजलेल्या कंपन्यांचे अँटीसेप्टिक लिक्विडचा फरशी साफ करण्यासह, अंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी, कापडी मास्क, रुमाल धुण्यासाठी वापर वाढला आहे. परिणाम नावाजलेल्या कंपन्यांच्या अँटीसेप्टिक लिक्विडच्या मागणीत वाढ झाली आहे.

औषधी दुकानांमध्ये नावाजलेल्या अँटीसेप्टिक लिक्विडचा तुटवडा आहे. त्यामुळे सहज उपलब्ध होणारे नावजलेल्या कंपन्यांचे अँटीसेप्टिक लिक्विड नागरिकांना मिळण्यास तयार नाही. कोरोना विषाणूशी दोन हात करत असताना त्यापासून सुरक्षा होईल असे प्राथमिक साधन तरी नागरिकांना सहज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 

सध्या नावाजलेल्या अँटीसेप्टिक लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधीविक्रेत्यांकडून मागणी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नावाजलेल्या कंपन्यांचे अँटीसेप्टिक लिक्विडचा तुटवडा संपुष्टात येईल. 
ए.एम. मिटकरी, साहाय्यक आयुक्त, औषध प्रशासन, जालना. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com