समाज विकासासाठी एकजूट दाखवा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - ‘प्रत्येक समाजाने संघटित होऊन संवैधानिक मार्गाने इतरांच्या अधिकारांवर गदा न आणता आपला विकास केला; तर देशाचा विकास होईल. त्यामुळे समाज संघटना आवश्‍यक असून, भावसार समाजानेही एकजूट व्हावे’, असा प्रातिनिधिक सूर भावसार बिझनेस कम्युनिटीच्या बैठकीत सहभागी वक्‍त्यांच्या विचारांतून उमटला. 

शहरातील रामायणा सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (ता. २२) ही बैठक झाली. सुरवातीला देवेंद्र भावसार (लासगाव) यांनी मार्गदर्शन केले. तसेच राजहंस जाधव (जालना) यांनी अनुभव कथन केले. यामध्ये समाजातील सर्वच स्तरांवरील व्यावसायिक, नोकरदार आणि महिलावर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन गरजूंना नोकरी, छोट्या व्यावसायिकांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. बैठकीसाठी सचिन रणसुभे, कपिल नवले, पंकज भावसार, स्वप्नील महाडीक, प्रमोद महिंद्रकर यांच्यासोबतच इतरांनी पुढाकार घेतला. 

फेसबुक, व्हॉट्‌सॲपद्वारे संघटन 
समाजातील काही तरुणांनी फेसबुकवर ‘भावसार मार्केट’ हा ग्रुप तयार करून समाजबांधवांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बघता-बघता या ग्रुपमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त समाजबांधव एकत्र आले. या ग्रुपच्या माध्यमातून समाजाची प्रगती, समाजातील समस्या सोडविणे, समुदाय मूल्याची सर्व समाजबांधवांना ओळख व्हावी, समाजातील प्रत्येक समाजबांधवांपर्यंत पोचून त्याला मुख्य प्रवाहात आणणे, तसेच एकमेकांच्या ओळखीचा, कामाचा समाजबांधवांना कसा फायदा करून देता येईल, या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यातून ‘भावसार बिझनेस कम्युनिटी’ची संकल्पना पुढे आली.

Web Title: Show community unity for development