बहुजनांचा जातीयवाद कुणी जोपासला? - श्रीपाल सबनीस

व्याख्यानमालेत सोमवारी बोलताना श्रीपाल सबनीस. मंचावर (डावीकडून) डॉ. शिवाजीराव थोरे, पंडितराव हर्षे, डॉ. अनिल आर्दड.
व्याख्यानमालेत सोमवारी बोलताना श्रीपाल सबनीस. मंचावर (डावीकडून) डॉ. शिवाजीराव थोरे, पंडितराव हर्षे, डॉ. अनिल आर्दड.

औरंगाबाद - ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा वाक्‍प्रचार कित्येक दशकांपासून प्रचलित आहे; पण आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर फुले वेगळे झाले, शाहू वेगळे झाले आणि आंबेडकर वेगळे झाले. अनुयायांनी महापुरुषांची वाटणी केली. बहुजनांचा हा जातीयवाद कुणी जोपासला,’’ असा रोकडा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला. ‘‘तिन्ही महापुरुषांच्या भूमिकांमध्ये मोठा समन्वय आणि संवाद आहे,’’ असेही ते म्हणाले.

देवगिरी महाविद्यालयाच्या ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’ला सोमवारी (ता. २८) सुरवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पहिले पुष्प गुंफले. ‘सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा’ या विषयावर त्यांनी आपल्या खास शैलीत मांडणी केली. या वेळी विचारपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड होते. प्रा. राहुल साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला लक्ष्मणराव मनाळ, रा. रं. बोराडे, त्रिंबकराव पाथरीकर, श्रीराम जाधव उपस्थित होते.

मंगळवारी (ता. २९) विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘प्रशासन - सामाजिक उत्थानाचे प्रभावी साधन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने थोर विचारवंत रा. ना. चव्हाण यांना डी.लिट. जाहीर केली होती. तसे पत्रही पाठविले; मात्र आजवर त्यांचा सन्मान केला गेला नाही. साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या बाबतीत जे घडले, तेच या विद्यापीठाने चव्हाण यांच्या बाबतीत केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीतील हा मोठा गुन्हा आहे. याबाबत आपण कुलगुरूंनाही पत्रे लिहिल्याचे श्री. सबनीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com