‘शुभकल्याण’च्या दिलीप अपेटला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बीड : जादा व्याजदराच्या आमिषाने ठेवीदारांची 13 कोटींवर फसवूणक केल्या प्रकरणी बीडसह इतर ठिकाणी 22 गुन्हे नोंद होऊन फरार असलेला ‘शुभकल्याण’ मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप शंकरराव आपेट याला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 24) पुण्यातून अटक केली. शनिवारी (ता. 25) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (ता. 27) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या विविध शाखांमध्ये हजारो ठेवीदारांच्या फसवणूकीचे त्याच्यासह संचालक मंडळावर गुन्हे नोंद आहेत. 28 जानेवारीला पहिला गुन्हा नोंद झाल्यापासून तो फरार होता. 

वैद्यनाथ बँकेविरुद्ध कोर्टात गेला अन जाळ्यात अडकला
त्याच्या अधिपत्याखालील शंभू महादेव साखर कारखान्याने वैद्यनाथ बँकेकडून घेतलेले कर्ज थकविल्याने वैद्यनाथ बँकेने कारखान्यावर जप्ती आणली. शुक्रवारी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या कारवाईविरोधात दाद मागण्यासाठी दिलीप आपेटने पुण्यातील डेबीट रिकव्हरी ट्रीब्यूनलमध्ये (ऋण वसुली न्यायाधीकरण) धाव घेतली. याच वेळी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक प्रशांत शिंदे, सहायक निरीक्षक विवेक पाटील, फौजदार योगेश खटके, संजय पवार, भाऊसाहेब चव्हाण, अशोक नन्नवरे, अमोल कदम, राम बहीरवाळ, नितीन वडमारे, राजू पठाण, गंधारी मस्के, अयोध्या मस्के यांच्या पथकाने अटक केली.

22 गुन्हे 13 कोटींची फसवणूक
शुभकल्याण मल्टीस्टेटमधून 13 कोटी रुपयांच्या फसवणूकीचे 22 गुन्हे नोंद आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यात 10 ठाण्यांत गुन्हे नोंद असून आर्थिक गुन्हे शाखा एकत्रित तपास करत आहे. तसेच परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबादेत 12 गुन्हे नोंद आहेत.

Web Title: shubhakalyan s dilip aapet in police custody