किल्लेधारुरला कडकडीत बंद, बाजारपेठेत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

सकाळपासून शहरातील हाँटेल्स, पान ठेले, फेरीवाले बंदमध्ये सहभागी झाल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. तर शहरातील दवाखाने, शैक्षणिक, निमशासकीय संस्था बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.

किल्लेधारुर : नागरीकत्व सुधारणा कायद्याचे निषेधार्थ शनिवारी (ता.21) किल्लेधारुर शहरात बंद पाळण्यात येत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प असून, रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे. 

सकाळपासून शहरातील हाँटेल्स, पान ठेले, फेरीवाले बंदमध्ये सहभागी झाल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. तर शहरातील दवाखाने, शैक्षणिक, निमशासकीय संस्था बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. शहरात मुस्लिम समाजाचे नेते सादेक ईनामदार, रज्जाक मिस्त्री यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बंद शांततेत करण्याचे आवाहन केले. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणि प्रशासनाने खबरदारी म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. उपविभागीय पोलीस अधीकारी, पोलीस निरीक्षक विश्वनाथ नाईकवाडे पोलीस फौजफाट्यासह नजर ठेवून आहेत.

Image may contain: sky and outdoor
धारूरच्या रस्त्यांवरील शुकशुकाट आणि बंद बाजार

आष्टीत सर्वधर्मीय महामोर्चा
तहसीलदारांना दिले निवेदन

आष्टी : राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएबी) विरोधात आज (ता. 21) शहरात सर्वधर्मीय संघटनांची एकत्रित येत भव्य आक्रोश मोर्चा काढत या कायद्यांचा निषेध नोंदविला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदानातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बामसेफ, भीम आर्मी आणि बहुजन समाज पार्टी या संघटनांनी या मोर्चास जाहीर समर्थन दिले. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

शहरातील किनारा चौक, शिवाजी चौक, शनी मंदीर, कमान वेस, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे तहसील कार्यालयावर पोहोचलेल्या या मोर्चात तहसील कार्यालयासमोर मान्यवरांनी संबोधित करत मार्गदर्शन केले. पाच ते सहा वर्षे वयोगटांच्या मुलांनी तहसीलदारांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. तहसील कार्यालयापासून मोर्चेकर्यांना परत जाण्यासाठी मोफत रिक्षांची सोय करण्यात आली होती.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shut Down in Dharur, Protest March in Ashti, Beed District