भावंडांचा तलावात बुडून बीडजवळ मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

बीड : तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रामनगर शिवारात शनिवारी (ता. १९) घडली. सुरज राजेश पवार (वय १५) व रंजना राजेश पवार (वय 8, सात्रापोत्रा, बीड) अशी मृत भावंडांची नावे आहेत. बुडणाऱ्या बहिणीला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सुरजला रंजनाने मिठी मारली आणि दोघे बुडाले. पाण्यातून बाहेर काढलेले मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत होती. 

सात्रापोत्रा येथील सुरज व रंजनाचे आई वडिल रामनगर येथील विहिरीच्या कामासाठी येत असत. शनिवारी हे सर्व कुटूंब आल्यानंतर त्यांची मुले सुरज व रंजना पोहण्यासाठी बाजूच्या तलावात गेले. सुरज याला पोहता येत असल्याने तो आपल्या बहीणीलाही पोहायला शिकवत होता. मात्र, तलावाच्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने रंजना ही बूडू लागली. तिने आरडाओरड करताच सुरज तिला वाचविण्यासाठी गेला असता तिने त्याला घट्ट मिटी मारली व यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे तलावातून बाहेर काढताना हे दोघे मिटी मारल्याच्या अवस्थेतच होते. मात्र खुप वेळापासून मुले येत नसल्याने पालकांनी तलावाकडे धाव घेतली. त्यावेळी ही दुर्घटना झाल्याचे लक्षात आले.

बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. राजेश पवार यांना सुरज आणि रंजना ही दोनच मुले होती. मात्र, शनिवारच्या या दुर्घटनेत त्यांनी दोघांनाही एकाच वेळी गमावल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. दोघेही घटनास्थळीच मृत होऊनदेखील आणखीन एकदा तपासणी करण्याची विनवणी करत हे माता-पित्यांचा आक्रोश सुरु होता.
 
Web Title: siblings drown in a lake and drown near Beed