पुढच्या पिढीत चाळिशीतील आजार पंचविशीत

Sickness
Sickness

औरंगाबाद - वाढलेले शहरीकरण आणि यंत्रांमुळे कमी झालेले शारीरिक श्रम यामुळे भारतीयांमध्ये स्थूलता वाढत आहे. यातून रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. सध्या चाळिशीत होणारे आजार पुढच्या पिढीला पंचविशीतच होतील. हे भारतीयांपुढील आव्हान असल्याचा सूर स्थूलता परिषदेतून निघाला. 

राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेला शुक्रवारी (ता. सात) सुरवात झाली. जागतिक स्थूलता संस्थेच्या नियोजित अध्यक्षा डॉ. डोना रेयान, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, अखिल भारतीय स्थूलताविषयक प्रगत संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बन्सी साबू यांची प्रमुख उपस्थिती होती.

तज्ज्ञ म्हणतात हे करा...
 मुलांना आहारात कच्चे मोड आलेले कडधान्य द्या
 मुलांना गॅझेट्‌सपासून लांब ठेवा 
 दररोज किमान एक तास खेळण्यासाठी बाहेर पाठवा
 पेस्टिसाईड्‌सचा भाज्या, धान्यावर वाढलेला वापर आरोग्याला हानिकारक
 बैठे काम करणाऱ्यांनी ९० मिनिटांनंतर काही काळ उभे राहा
 चहा, कॉफी, ज्युसऐवजी भरपूर पाणी प्यावे.

कोण काय म्हणाले...
डॉ. डोना रेयान - कमरेवरील चरबीमुळे यकृताचे आजार, हृदयरोग, मधुमेह आणि रक्तदाबाचे आजार होतात. त्यामुळे भारतीयांचे आयुर्मान घटलेले आहे. वजनवाढीसाठी आहार-विहाराचे योग्य संतुलन साधायला हवे. 

डॉ. बन्सी साबू - अनेक पॅक्‍ड फूड चेन्सना अमेरिकेने बंदी घातली आहे. मात्र, भारतात ते मोठ्या प्रमाणात खपतात. दररोज अर्धा तास व्यायाम व अर्धा तास चालावे. भाकरी, कच्च्या भाज्या आणि स्थानिक अन्नावर अधिक भर द्या.

डॉ. शशांक जोशी - २००५ मधील स्थूलतेविषयीच्या अभ्यासानुसार घरातील एका गॅझेटमागे १० किलो वजनवाढ होते, असे दिसून आले. शहरीकरणात सुखवस्तूता आली आहे. प्रत्येकाने आपल्या स्थूलतेवर नियंत्रण मिळवायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com