समृद्धी वाघिणीने दिला पांढऱ्या बछड्याला जन्म 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

औरंगाबाद - औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी या वाघिणीने गेल्या महिन्यांत तीन बछड्यांना जन्म दिला. त्यापैकी एक बछडा पांढऱ्या रंगाचा आहे. जवळपास वीस दिवसांच्या देखभालीनंतर समृद्धी आणि बछड्यांच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. 

समृद्धीचा संकर पांढऱ्या वाघाशी झाला असावा व त्यातून पांढऱ्या बछडाचा जन्म झाला, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. तीन पिढ्यांपूर्वीच्या जनूक संक्रमणातूनही हा प्रकार झाला असावा, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे. तीन बछड्यांमुळे आता सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या नऊवर पोचली असल्याची माहिती उद्यानाचे संचालक विजय पाटील यांनी दिली. यामध्ये आठ बछड्यांसह आधीच्या एका मोठ्या पांढऱ्या वाघाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Siddharth Garden Zoo aurangabad