esakal | महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या सिद्धेश्वर, रत्नेश्वर देवस्थानची यात्रा रद्द; प्रशासनाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Latur Latest News}

बैठकीत यात्रा पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजा मात्र होणार आहेत.

marathwada
महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या सिद्धेश्वर, रत्नेश्वर देवस्थानची यात्रा रद्द; प्रशासनाचा निर्णय
sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची होत असलेली यात्रा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. सोमवारी (ता. एक) देवस्थानच्या प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यू. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, विश्वस्त अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव


बैठकीत यात्रा पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजा मात्र होणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजातर्फे केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होईल. यासाठी त्यांना पास दिले जाणार आहेत. सकाळी ९:३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - भीषण अपघात! साताजन्माची शपथ राहिली अधुरी; पतीने सोडली मधेच साथ

त्यानंतर पाच लोकांच्या उपस्थितीतच माळी समाजाचा पुष्पाभिषेक केला जाणार आहे. दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली. त्याऐवजी या काठ्यांचे गाभाऱ्यातच प्रत्येकी दोन मानकऱ्यांच्या हस्ते पूजन होईल. यात्रा कालावधीत केले जाणारे भजन- कीर्तन व काकडा कोरोना विषयक नियम पाळून केवळ ११ लोकांच्या उपस्थितीत केले जाईल. शिवरात्रीनिमित्त दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक श्रीमती पाटील यांनी केले आहे. बैठकीस तलाठी दत्ता शिंदे, विशाल झांबरे, व्यवस्थापक दत्ता सुरवसे यांची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर