आठ महिन्यांच्या गर्भवती आमदारांची ड्युटी फस्ट; अधिवेशनालाही नियमित हजेरी 

दत्ता देशमुख
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

बीड : ‘जबाबदारी आणि ओझं’ यातला फरकच अनेकांना कळत नाही. अधिकाराच्या खुर्चीवर बसल्यानंतर तर आपणच सर्वकाही, आपण ठरवू ती पूर्वदिशा असा अहंपणा अंगी येतो; परंतु राजकीय खुर्चीवर बसलेल्यांचा पाच वर्षांनी हिशोब होतो. आपण दिलेल्या कमीटमेंट पूर्ण करणं, त्यासाठीचा पाठपुरावा करणं आणि दिलेल्या आयुधांचा वापर करून समस्यांची सोडवणूक करणं हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते.

बीड : ‘जबाबदारी आणि ओझं’ यातला फरकच अनेकांना कळत नाही. अधिकाराच्या खुर्चीवर बसल्यानंतर तर आपणच सर्वकाही, आपण ठरवू ती पूर्वदिशा असा अहंपणा अंगी येतो; परंतु राजकीय खुर्चीवर बसलेल्यांचा पाच वर्षांनी हिशोब होतो. आपण दिलेल्या कमीटमेंट पूर्ण करणं, त्यासाठीचा पाठपुरावा करणं आणि दिलेल्या आयुधांचा वापर करून समस्यांची सोडवणूक करणं हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते.

बहुतेक जण ती आपापल्या पद्धतीने पार पाडतातही; परंतु केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडांची सध्याची अधिवेशनातली नियमित हजेरी, कामकाजात सहभाग आणि मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी धावपळ याचे समर्थक आणि सोशल मीडियातून ‘ड्युटी फर्स्ट’ या टॅगलाईनने कौतुक होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नमिता मुंदडा या आठ महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांचा हा नित्यक्रम आणि सातत्य. 

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन....काय आहे प्रकरण?

केज मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमिता मुंदडा या लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या सुन आहेत. सुख - दु:खात हजर राहणं, कायम लोकसंपर्क, कामांसाठी पाठपुरावा ही मुंदडा घराण्याची ओळख. म्हणूनच दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांना सलग पाच वेळा मतदारसंघातून सहज विजयी होता आलं. डॉ. विमल मुंदडा यांनी देखील कर्करोगाने आजारी असतानाही मंत्रीपदाची खुर्ची तेवढच्याच सक्षमतेने सांभाळली. नमिता मुंदडा यांनीही सासूबाईंच्याच पावलावर पाऊल टाकत ‘जबाबदारीची जाण’ मनात ठेवली आहे. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

वास्तुविशारद विषयात गोल्ड मेडॅलिस्ट असलेल्या नमिता मुंदडा यांनी पॅरीस येथील ‘एकोल देस पॉन्ट्स पॅरीस टेक’ विद्यापीठातून वास्तू विशारद अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. जगभरातील ३५ विद्यार्थी आणि भारतातील दोन विद्यार्थ्यांत त्यांचा समावेश होता. ‘मास्टर्स इन इंजिनिअरिंग ॲण्ड आर्किटेक्चर’ अभ्यासक्रमासाठी जगभरातील ३५ विद्यार्थ्यांमध्ये भारातील दोन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मतदारसंघात निवडणुकीची तयारी करताना महिन्यातील सात दिवस विद्यापीठात बंधनकार असलेली हजेरी त्यांनी पूर्ण केली होती. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीतही गर्भवती असलेल्या नमिता मुंदडा पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे फिरत होत्या. त्यांच्या प्रयत्नाला मतदारांनीही भरभरून दान दिले आणि जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी त्यांच्या नावापुढे आमदार लागले; परंतु आमदार ही पदवी नाही तर जबाबदारी आहे याची जाण त्यांनी मनात कायम ठेवली आहे. सध्या आठवा महिना असलेल्या नमिता मुंदडा अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमितपणे सहभागी होत आहेत. या हजेरीसह मतदारसंघातील प्रश्नांसाठी त्यांचा मंत्र्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

अधिवेशनात नगर विकास विभागाकडे त्यांनी केज - अंबाजोगाईचे उद्यान, नाट्यगृह, नाल्या, रस्ते आणि बांधकाम विभागाकडे मोठ्या रस्त्यांचे प्रश्न मांडून संत भगवानबाबांच्या बंदूक चोरी प्रकरणाच्या चर्चेत सहभागी होत कारवाईची मागणी केली. त्यांनी या काळात गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ या मंत्र्यांच्याही भेटी घेऊन मतदार संघातले प्रश्न मांडले. या दालनातून त्या दालनात चालत जाणे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने दगदग या बाबी आठ महिन्यांच्या गर्भवतीला आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायकच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant functioning of Beed MLAs