उमरगा येथे मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चा

अविनाश काळे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहाची निर्मिती करावी. या मागण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन मूक मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरवात झाली.

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागण्यांसाठी येथील मुस्लीम जमाअत कमेटीच्या वतीने शुक्रवारी (ता. 3) दुपारी 3 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. सद्यस्थितीत राज्यात उमरग्यातून मुस्लीम बांधवांनी पहिल्यांदाच आरक्षणाच्या मागणीसाठी मूकमोर्चा काढून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण देण्याची कारवाई शासनाने करावी, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे, मराठा आरक्षणाच्या काळात मोर्चेकरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहाची निर्मिती करावी. या मागण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन मूक मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरवात झाली.

प्रारंभी शिवाजी चौकात मुस्लीम समाजाच्या मागण्याला पाठींबा असल्याचे जाहिर करून शिवसेनेचे किरण गायकवाड यांनी मुस्लीम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सकल मराठा मोर्चाचे अध्यक्ष विनोद कोराळे, विवेक हराळकर, संतोष शिंदे, संतोष शिंदे, सचीन जाधव, योगेश तपसाळे यांनी मोर्चाला पाठींबा दिला. धनगर समाज संघटनेचे जालिंदर घोडके, नगरसेवक गोविंद घोडके, राघवेंद्र गावडे, विमलताई सुरवसे यांनी मोर्चात सहभाग घेतला. काँग्रेस समिती कार्यालयासमोर दिलीप भालेराव यांनी हाजी बाबा औटी यांच्यासह इतर बांधवांचे स्वागत केले. तहसील कार्यालयासमोर प्रा. शौकत पटेल, रजाक अत्तार, मसूद शेख (उस्मानाबाद), मौलाना अयुब यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा या पुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा बोलताना दिला. मराठा समाज, धनगर समाजाच्या आरक्षणाचाही तातडीने निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले. मुस्लीम जमाअत कमेटीचे अध्यक्ष हाजी बाबा औटी, कार्याध्यक्ष अतिक मुन्शी, सचिव अलिम विजापुरे, सल्लागार रजाक अत्तार, शमीम सास्तुरे, निजाम व्हंताळे, जाहेद मुल्ला, राजु हन्नुरे, कलीम पठाण, इसाक शेख, मशाक शेख, इस्माईल शेख, नगरसेवक वसीम शेख, जाफर अत्तार, शमशोद्दीन जमादार, अॅड. ख्याजा शेख, ख्याजा मुजावर, याकुब लदाफ, हाफीज युसूफ, हाफीज सादीक, मूफ्ती समीऊद्दीन ( तुरोरी ), मौलाना गुलाम नबी, अमीर साहब, हाफीज फहीम, हाफीज दस्तगीर, अस्लम शेख, सत्तार मुल्ला यांच्यासह ग्रामीण भागातुन असंख्य मुस्लीम बांधव मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदार अरविंद बोळंगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A silent march for reservation of Muslims and Dhangar community at Umarga