सिल्लाेड ः 13 अपक्षांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे

सचिन चोबे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या जागेसाठी दाखल असलेल्या 20 उमेदवारांपैकी 13 अपक्ष उमेदवारांनी साेमवारी (ता.सात) उमेदवारी अर्ज मागे घेतले. सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणूक रिंगणात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नबी, काँग्रेसचे कैसर आझाद शेख अब्दुल गफुर शेख, वंचित बहुजन आघाडीचे दादाराव किसन वानखेडे, बसपाचे संदिप एकनाथ सुरडकर (बसपा), तर अपक्षांमध्ये प्रभाकर माणिकराव पालोदकर, ज्योती साहेबराव दणके व अजबराव पाटीलबा मानकर यांची लढत होणार आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या जागेसाठी दाखल असलेल्या 20 उमेदवारांपैकी 13 अपक्ष उमेदवारांनी साेमवारी (ता.सात) उमेदवारी अर्ज मागे घेतले. सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणूक रिंगणात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नबी, काँग्रेसचे कैसर आझाद शेख अब्दुल गफुर शेख, वंचित बहुजन आघाडीचे दादाराव किसन वानखेडे, बसपाचे संदिप एकनाथ सुरडकर (बसपा), तर अपक्षांमध्ये प्रभाकर माणिकराव पालोदकर, ज्योती साहेबराव दणके व अजबराव पाटीलबा मानकर यांची लढत होणार आहे. भाजपचा असलेला मतदारसंघ राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे येथे भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात होते.

आज उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रमुख भाजप पदाधिकारी असलेले व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश पांडुरंग बनकर, सुनील प्रभाकरराव मिरकर, दादाराव श्रीराम आळणे यांचेसह सवितादेवी रघुनाथ घरमोडे, रियाजुद्दीन गयासुद्दीन देशमुख, मुश्ताकखा मनवरखा मेवाती, अरुण चिंतामण चव्हाण, मच्छिंद्र श्रीरंग पालोदकर, संतोष नारायण पालोदकर, पुंडलिक मारुती ताठे, मुश्ताक सादिक शेख, संदिप रामदास इंगळे, शफिक भिकन शेख यांन उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sillod Constituency: 13 Independents Candidates Withdraw Nomination