सव्वीस गावांना चाळीस टॅंकरद्वारे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सिल्लोड - तालुक्‍यातील सर्वच धरणांचा पाणीसाठा मृतावस्थेत असून, पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.

टॅंकरच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यःस्थितीमध्ये चाळीस टॅंकरद्वारे सव्वीस गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, वीस गावांना तेहतीस अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सोळा गावांच्या टॅंकरच्या मागणीचे ठराव प्रशासकीय पातळीवर पडून आहेत. 

तालुक्‍यातील धरण क्षेत्रासह संपादित क्षेत्रातील विहिरी प्रशासन ताब्यात घेत आहे. सिल्लोड शहरासही खेळणा मध्यम प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील चार ते पाच विहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

शहरास सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवणार आहेत.

धरणाच्या संपादित क्षेत्रातील विहिरी ताब्यात घेण्याच्या हालचाली 
टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पुढील काळात अडचणी येणार असून, खेळणा मध्यम प्रकल्पातील अधिग्रहित विहिरींमधून शहरास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उर्वरित तालुक्‍यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी चारनेर - पेंडगाव मध्यम प्रकल्प, केळगाव मध्यम प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील विहिरी ताब्यात घेतल्यानंतरच टॅंकर भरण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Web Title: sillod marathwada news 26 village tanker water supply