परवान्यातून दिसणार चालक-वाहनाची कुंडली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - बोगस वाहन परवाना आणि वाहन नोंदणीतील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने देशभर समान प्रक्रिया वापरण्यात येणार आहे. याद्वारे लवकरच देशभर सारख्याच पद्धतीचे वाहन परवाने आणि आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) दिसणार आहेत. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. 

प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीचे वाहन परवाने आहेत. त्यातही अनेक परवाने बोगस असल्याचा संशय आहे. म्हणूनच केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुन्यांना फाटा देत नवीन "हाय सिक्‍युरिटी स्मार्ट कार्ड' ही संकल्पना मांडली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये बावीस कॉलममध्ये चालकाची तर आरसीमध्ये वाहनाची संपूर्ण कुंडली राहणार आहे. यासाठी क्‍यूआर कोड आणि चिपकार्ड देण्यात आले आहे. 

असा असेल नवा परवाना  
"इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन' या शीर्षकाखाली माहिती 
डाव्या बाजूला राजमुद्रा तर उजव्या बाजूला छायाचित्र 
दर्शनी भागातच नाव, जन्मतारीख, पत्ता, अवयवदानाची स्थिती 
परवाना दिल्याची, संपण्याची तारीख आणि परवाना क्रमांक 
पाठीमागे डाव्या बाजूला इलेक्‍ट्रॉनिक्‍स चिप, तर उजव्या बाजूला क्‍यूआर कोड. 
नोंदणी क्रमांक, परवान्याचा प्रकार नमूद असेल. 

सहा महिन्यांची प्रतीक्षा 
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून, एक महिना हरकती मागविल्या आहेत. ता. एक जुलै 2019 पासून या नवीन पद्धतीचा वाहन परवाना व आरसी सुरू करण्याचा विचार आहे.

Web Title: similar type of vehicle licenses and RC (registration certificates) in the country