कोरेगाव-भीमा तणावाला भाजप व संघ जबाबदार - केजरीवाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

सिंदखेड राजा - शिवाजी महाराजांच्या विचारशैलीप्रमाणे काम करण्याचे आश्‍वासन देऊन भाजपने 2014 मध्ये सत्ता मिळविली. मात्र, आता शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या विचारांच्या विपरीत कार्य करीत आहे. भीमा-कोरेगाव येथील तणावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप जबाबदार आहे, असा घणाघाती हल्ला शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 

महाराष्ट्राचे प्रेरणास्थान राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आम आदमी पक्षाच्या वतीने येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र संकल्प सभेत ते बोलत होते. त्यापूर्वी जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन ते जिजाऊचरणी नतमस्तक झाले. 

फाळणीनंतर सतत 70 वर्षांपासून पाकिस्तान हा भारतात फूट पाडण्याचे धोरण आखून कारस्थान रचतो. जे त्यांना जमले नाही ते भाजप शासनाने तीन वर्षांत करून दाखविले, अशी टीका केजरीवाल यांनी केली. दिल्ली व महाराष्ट्राची तुलना करताना ते म्हणाले की, आम्ही वीज, सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मोफत दिली. भाजप जातीजातीत भांडणे लावीत राज्य करीत आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात दंगलींच्या माध्यमातून मनामनात द्वेष पसरवून भाजप ही निवडणूक जिंकेल, असा आरोपही त्यांनी केला. केवळ 60 हजार इंग्रजांनी 30 कोटी भारतीयांवर राज्य केले. त्यांची फूट पाडा, राज्य करा ही कूटनीती भाजपने आखली आहे. तुम्हाला दंगली, द्वेष, मनामनातील कलुषितता पाहिजे की, वीज, शिक्षण, रोजगार असा प्रश्‍न त्यांनी सभेतील उपस्थितांना केला. 

Web Title: sindhkhed raja marathwada arvind kejriwal koregaon bhima rss bjp