अल्पवयीन बहिणीवर भावाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पिशोर (ता. कन्नड) येथे झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलाने अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (ता. सहा) उघडकीस आली. आई बाहेर गेल्याचा फायदा घेत अठरावर्षीय भावाने सोमवारी (ता. पाच) बहिणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. आई घरी परतल्यावर मुलीने झालेला सर्व प्रकार सांगितला असता, ही बाब कुणाला सांगू नको म्हणून मुलीला दटावले. ही घटना मुलीने तिच्या आईस सांगितली असता तिच्या आईने ‘कोणाला काही सांगितले तर याद राख,’ असे बजावून तिलाच काठीने मारहाण केली.

कोणाला सांगू नको म्हणून आईने मुलीलाच दटावले; भाऊ, आईला अटक
पिशोर - पिशोर (ता. कन्नड) येथे झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलाने अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (ता. सहा) उघडकीस आली. आई बाहेर गेल्याचा फायदा घेत अठरावर्षीय भावाने सोमवारी (ता. पाच) बहिणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. आई घरी परतल्यावर मुलीने झालेला सर्व प्रकार सांगितला असता, ही बाब कुणाला सांगू नको म्हणून मुलीला दटावले. ही घटना मुलीने तिच्या आईस सांगितली असता तिच्या आईने ‘कोणाला काही सांगितले तर याद राख,’ असे बजावून तिलाच काठीने मारहाण केली. याचा फायदा घेत आरोपी भावाने मंगळवारी (ता. सहा) बहिणीला ठार मारण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. मुलीला त्रास होत असल्याने ती रडत असल्याचे पाहून गल्लीतील महिला गोळा झाल्या. त्यांनी याबाबत सदर मुलीला विचारणा केली असता, बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार उघडकीस आला.

परिसरातील एका सामाजिक कार्यकर्तीने पीडित मुलीला सोबत घेऊन सरळ पोलिस ठाणे गाठले आणि झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून भावाविरुद्ध बाल न्याय (बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम) २०१२ प्रमाणे बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आईला सहआरोपी करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि पीडितेच्या आईला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister Raped by Brother Crime