बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या

बीड तालुक्यातील नाथापूर येथील घटना
Sundar kasabe
Sundar kasabe

बीड - प्रेमप्रकरणातून बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २५) रात्री तालुक्यातील नाथापूर येथे घडली. सुंदर साहेबराव कसबे (वय २२, रा. पिंपळादेवी, ता. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुंदर कसबे हा ऊसतोड मजुरीचे काम करतो. ऊसतोडीचे काम करताना त्याची ओळख लऊळ क्रमांक दोन (ता. माजलगाव) येथील एका तरुणीशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. महिनाभरापूर्वी ऊसतोडीहून दोन्ही कुटुंबे गावी परतली. प्रेम प्रकरणातून सुंदर कसबे याने मुलीला पळवले.

मात्र, कुटुंबीयांनी विरोध केल्यावर सुंदर कसबे याने मुलीला तीच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. मात्र, मुलीचा भाऊ शिवाजी ऊर्फ बाबा चांदणे याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. २५ जून रोजी सुंदर कसबे हा आईसोबत नाथापूर येथे आठवडी बाजारात आला होता. आईला बाजारात सोडून तो पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला.

यावेळी पंपामागे नेऊन शिवाजी ऊर्फ बाबा चांदणे याने त्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो पसार झाला. माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, फौजदार बाबासाहेब खरात, पोलिस नायक रामप्रसाद कडुळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com