CoronaUpdate : उस्मानाबादला पून्हा एक धक्का, उमरग्यात वाढली संख्या, वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus
CoronaVirus

उमरगा: उमरगा तालूक्यात आणखी एका पॉझिटिव्ह रूग्णाची भर पडल्याने आता रुग्ण संख्या सहा झाली आहे. मंगळवारी (ता.२६) रात्री आलेल्या अहवालात बेडगा येथील साठ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो १६ मे रोजी मुंबई येथून आला होता. दरम्यान  अहवाल प्राप्त झाल्यानंतर रात्री उशीरा बेडगा येथे प्रशासनाने गावच्या सिमा व गावातील कांही भाग सिल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याबाबतची माहिती अशी की, बेडगा येथे १६ मे रोजी मुंबई येथून दोन ट्रॅव्हल्स मधून तीस व्यक्ती आल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयात त्यांची  तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांनी त्या लोकांना गावापर्यंत येण्यासाठी दुसऱ्या वहानांचा पर्याय नको म्हणून मुंबईहून आलेल्या एका ट्रॅव्हल्समधून गावात आणण्यात आले आणि  तीस लोकांना गावाच्या शाळेत व्यवस्था केली.

एका साठ वर्षीय व्यक्तीला ताप येण्याचे लक्षणे सुरू झाल्याने स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्या व्यक्तीला औषधोपचार सुरू केले. परंतू ताप कमी होत नसल्याने सरपंच मनोहर माने, उपसरपंच प्रभाकर माने यांनी त्या व्यक्तीला २१ मे रोजी  तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रारंभी सारी आजाराचे लक्षणे त्या व्यक्तीत होते. २२ मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता मात्र तीन दिवस अहवाल प्राप्त झाला नसल्याने सोमवारी (ता.२५) पुन्हा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. २१ तारखेपासून तो संशीयत रुग्ण कक्षात दाखल होता. अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी दिली. दरम्यान बेडगा ग्रामस्थांनी भाऊसाहेब बिराजदार बँकेचे संचालक व गावचे प्रतिष्ठीत नागरिक सुनील माने यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी बैठक घेतली होती.

मुंबई, पूणे येथून येणाऱ्या लोकांसाठी शाळेत तसेच सोयीनुसार शेतात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जवळपास दिडशे लोकांची सोय करण्यात आली होती असे अनिल माने यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी विट्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ यांनी रात्री साडेदहा वाजता बेडगा गावाला भेट देऊन आढावा घेतला.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला शाळेत ठेवण्यात आले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने २१ मे रोजी उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गावच्या सिमा सिल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण प्रारंभी शाळेत असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे.
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com