esakal | लोअर दूधनाचे सहा दरवाजे उघडले, चार हजार ३८६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रविवारी ( ता.११) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास धराणाची सहा दरवाजे (०.२० ) मीटरने उचलून दूधना नदि पात्रात दोन चार ३८६ क्युसेसने पाण्याचा वसर्ग  करण्यात येत असल्याची माहिती धरणाच्या सुत्रांनी दिली.

लोअर दूधनाचे सहा दरवाजे उघडले, चार हजार ३८६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार होणार्‍या पावसामूळे धरणात पाण्याची अावक वाढत आहे. रविवारी ( ता. ११) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास धराणाची सहा दरवाजे (०.२० ) मीटरने उचलून दूधना नदी पात्रात दोन हजार ३८६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरणाच्या सुत्रांनी दिली.

लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासूनच जोरदार होत असलेल्या पाऊसमुळे दूधना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामूळे धरणातून दूधना नदी पात्रात धराणाचे दरवाजे  क्रमांक एक, दोन, तीन व १८, १९, २० हे (०.२०) मीटरने उचलण्यात आली असून प्रत्येकी ७३१ क्युसेसने दूधना नदी पात्रात चार हजार ३८६ क्युसेसने दूधना नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता त्यानुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचासहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती

तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. असा इशारा धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाच्यावतिने देण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही भागात शनिवारी ( ता. १०) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रविवारी ( ता. ११ ) रोजी पहाटेच्या सुमारास तिन वाजल्यापासून तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पीके काढणी, कापणी सुरू असलेल्या कपाशीसह सोयाबीन मोठ्या प्रमाणात भिजत आहेत. सद्य: परिस्थितीत परतीचा पाऊस सक्रीय झाल्याचे दिसून येत असल्यामुळे  शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकही वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत असून परिणामी राहिलेले पीकही आता हातात येतील की नाही अशी शंका शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image