राखीव दल भरती घोटाळ्यात सहा जवानांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पोलिसांचे पथक काल दुपारपासूनच राखीव दलात ठाण मांडून होते. रात्री उशिरा या पथकाने सहा जवानांना अटक केली आहे. यामध्ये अमोल विठ्ठल मांदळे भगवान सुखदेव बोरुडे बाळकृष्ण नामदेव वाघमारे महादेव रामचंद्र पवार विठ्ठल संतोष खरात विकास फुलचंद डोळे यांचा समावेश आहे.

हिंगोली : येथील राज्य राखीव दल भरती घोटाळ्यातील आरोपींची धरपकड मोहीम सुरू झाली असून पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ( ता. १८ ) रात्री उशिरा सहा जवानांना अटक केली आहे.

येथील राज्य राखीव दल भरती घोटाळा उघडकीस आला होता. यामध्ये तत्कालीन प्रभारी समादेशक जयराम कपाटे यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये वीस जवानांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने पोलीस निरीक्षक अशोक मैराळ, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अवचार यांच्या विशेष पथकाने घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी वीस जवानांच्या उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. तसेच संशयावरून आणखी दोन जवानांचा उत्तरपत्रिका जप्त करून त्याची पडताळणी केली जात आहे.

पोलिसांचे पथक काल दुपारपासूनच राखीव दलात ठाण मांडून होते. रात्री उशिरा या पथकाने सहा जवानांना अटक केली आहे. यामध्ये अमोल विठ्ठल मांदळे भगवान सुखदेव बोरुडे बाळकृष्ण नामदेव वाघमारे महादेव रामचंद्र पवार विठ्ठल संतोष खरात विकास फुलचंद डोळे यांचा समावेश आहे. हे सर्व जवान 2017 मध्ये राखीव दलात भरती झाले आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केले  जाणार असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: six jawan arrested in recruitment scam

टॅग्स