उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन सहा रुग्ण आढळले

file photo
file photo

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असलेली रुग्णसंख्या आता तेरावर पोचली आहे. यापूर्वी कळंब तालुक्यामध्ये पाच, तर वाशी, भूम व परांडा या तीन तालुक्यांत प्रत्येकी एक असे एकूण सात रुग्ण आढळले होते. बुधवारी यामध्ये सहा रुग्णांची भर पडली आहे. 

उस्मानाबाद शहरामध्ये एक, तुळजापूर, लोहारा, भूम प्रत्येकी एक, तर परांड्यामध्ये दोन असे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, उस्मानाबाद शहरातील रुग्णाला कर्करोग असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. त्याचे कुटुंब मुंबईहून सोलापूरला एका खासगी वाहनाने आले. तर सोलापूर ते तमलवाडीपर्यंतचा प्रवास त्यांनी पायी केला.

त्यानंतर उस्मानाबाद शहरातून तामलवाडीपर्यंत दुचाकीने गेलेले नातेवाईक त्यांना घेऊन आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सर्व जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे दोन रुग्ण आहेत. भूम तालुक्यातील गिरवलीच्या एका तेरा वर्षीय मुलाला कोरोनाचा लागण झाली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण असून, तुळजापूरची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ती गर्भवती असल्याचे समजते. सदर महिला पुण्याहुन आली आहे, तर अन्य पाच जण मुंबईहून आलेले आहेत.

जिल्हयात आल्यानंतर सर्व सहा जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. यापूर्वी कळंब तालुक्यातील पाथर्डीचे दोन, हावरगावचे दोन, कळंब शहरातील एक, भूम तालुक्यातील पन्हाळवाडीचा एक, तर परंडा तालुक्यातील सरणगावातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com