coronaviru - बीड जिल्ह्यातील सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

पिंपळा (ता. आष्टी) येथील एक ६० वर्षीय व्यक्ती तबलिगी जमातमधून आलेल्या आपल्या जावयाला भेटण्यासाठी नगरला गेला. संपर्कातील सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आले असून, आता जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही. 

बीड - पिंपळा (ता. आष्टी) येथील एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे नगरमध्ये उघड झाल्यानंतर त्याच्या पत्नीसह संपर्कातील सहा जणांच्या घशातील द्रवाची तपासणी करण्यात आली. या सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आले असून, आता जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही. 

पिंपळा (ता. आष्टी) येथील एक ६० वर्षीय व्यक्ती तबलिगी जमातमधून आलेल्या आपल्या जावयाला भेटण्यासाठी नगरला गेला. दरम्यान, त्याचे वास्तव्य असलेल्या नगरमधील भिंगार येथील मशिदीतील एकास कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कातील या व्यक्तीसह इतरांना नगर जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन केले. मात्र, क्वारंटाईन असताना व लॉकडाऊनच्या काळात तो पोलिसांची नजर चुकवून गावात आला. मात्र, नगरच्या प्रशासनाने पुन्हा त्याला विलगीकरण कक्षात दाखल केले.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

त्याच्यासह सोबतच्या अन्य एकाचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये एकाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने त्याच्या पत्नीसह संपर्कातील इतर पाच अशा सहा जणांना बुधवारी (ता. आठ) जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे अहवाल शुक्रवारी (ता. दहा) निगेटीव्ह आले. दरम्यान, जिल्ह्यातून आतापर्यंत १०९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six people in Beed district reported negative