नांदेड : महामार्गचे सहा पोलिस निलंबित 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिस चौकीच्या सहा पोलिसांना रविवारी (ता. ११) निलंबीत केले. मात्र निलंबीत पोलिसांवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी वरिष्टांनी मोकळा सोडल्याने पोलिसांतून संताप व्यक्त होत आहे. 

नांदेड : नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिस चौकीच्या सहा पोलिसांना रविवारी (ता. ११) निलंबीत केले. मात्र निलंबीत पोलिसांवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी वरिष्टांनी मोकळा सोडल्याने पोलिसांतून संताप व्यक्त होत आहे. . 

दरम्यान, नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलिस चौकीबाबत मागील अनेक दिवसांपासून तक्रारी वरिष्ठ कार्यालयात केल्या जात होत्या. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून त्याला तपासणीच्या नावाखाली लुटण्याचा प्रकार घडत आहे.

या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. या भागातील सुभाशीष कामेवार यांनी येथील पोलिसांच्या सर्व चुकीच्या व लुटारु पद्धतीचे सर्व पुरावे महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात दाखल करून तक्रार केली होती. एवढेच नाही तर हा प्रकार नाही थांबला तर स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

यावरून पोलिस अधिक्षक संजय शेत्रे यांनी विजय सुर्यवंशी, दिपक जाधव, आबाजी खोमणे, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे आणि ईश्‍वर राठोड यांना निलंबीत केले. ही चौकी तपासणी चौकी नसुन फक्त या ठिकाणी वाहनचालकांना सर्रास लुटण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे हा मार्ग अनेक वाहनचालकांनी बदलल्याचे सांगण्यात आले. या निलंबनीच्या कारवाईमुळे येथील अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six police suspended in nanded