सहा सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

लातूर - मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा वाहिनीअंतर्गत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होण्याकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आणखी सहा सौरऊर्जा प्रकल्पांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विद्युतकामांना तत्काळ गती देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांसह जनतेलाही मुबलक वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पालकमंत्री निलंगेकर यांनी मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा वाहिनीअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात जिल्ह्यात आणखी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील मदनसुरी, केळगाव, तांबाळा, शेडोळ, चिंचोली तपसे, शिरसी हंगरगा या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. तसेच किल्लारी, लिंबाळा दाऊ, साकोळ, एकोजी मुदगड, भेटा, भादा, उंबडगा, कामखेडा, पाथरटवाडी, मातोळा, विळेगाव, ढाळेगाव, थोडगा, लांजी या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हे प्रकल्पही लवकरच मार्गी लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निलंगा उपविभागाची पुनर्रचना करण्यात यावी, अशा सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे निलंगा विद्युत उपविभागाला मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील इतर प्रलंबित विद्युतकामांचा आढावा घेऊन ही प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लागावीत, असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.

Web Title: Six Solar Power Project Permission