उदगीरला सहा टन प्लॅस्टिक जप्त 

उदगीरला सहा टन प्लॅस्टिक जप्त 

उदगीर - लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता. १३) धडक कारवाई करीत सहा टनांहून अधिक प्लॅस्टिक जप्त केले आहे. सतरा जणांवर कारवाई करून त्यांच्याकडील कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या.

भाजी मार्केट भागातील मणियार स्टोअर्स येथील पाच टन प्लॅस्टिक जप्त करून पंचवीस हजारांचा दंड करण्यात आला; उद्योग भवन येथील चौपाटी, जनरल स्टोअर्स, गिफ्ट सेंटर येथून प्लॅस्टिक जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तेरा भाजी विक्रेत्यांकडील प्लॅस्टिक जप्त करून त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com