उन्नत भारत अभियाना अंतर्गत फुलंब्रीतील  सहा गावाची निवड - सावित्रीबाई फुले संस्था व एम.आय.टी कॉलेजचा पुढाकार

नवनाथ इधाटे
शनिवार, 30 जून 2018

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियाना अंतर्गत औरंगाबाद मधील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची नुकतीच निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षण महाविद्यालयांना यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. यातील तब्बल 750 महाविद्यालयाची आव्हानात्मक निवड करण्यात आली आहे.

फुलंब्री : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियाना अंतर्गत औरंगाबाद मधील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची नुकतीच निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षण महाविद्यालयांना यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. यातील तब्बल 750 महाविद्यालयाची आव्हानात्मक निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत सावित्रीबाई फुले संस्था व एम.आय.टी.कॉलेजने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने फुलंब्री तालुक्यातील सहा गावाची निवड ही केली आहे. यामध्ये शेलगाव, नरला, भावडी, शेवता, वाघलगाव, भोयगाव या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामकाजाचे दिल्ली येथून काम पाहण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात मूलभूत सुविधांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी शेलगाव खुर्द येथे एम.आय.टी कॉलेजचे 50 विध्यार्थी व 10 प्राध्यापक अशा टीमने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. या सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण आय.आय.टी. दिल्लीच्या अहवाल पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणावरून सर्व गावाचा समृद्धी विकास आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. या आराखड्याच्या मंजुरी नंतर प्रत्येक गावामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रशांत अंबड यांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी सावित्रीबाई फुले संस्थेचे प्रसन्न पाटिल, सुहाज आजगावकर, गजानन सैखेडकर, रतन अंभोरे, लहू ठोंबरे, गजानन इधाटे तर एम.आय. टी कॉलेजचे प्रशांत अंबड, संजय पाटील, विहित अग्रवाल, यदुराज ठाकरे, शिरीष राखूनडे, प्रशांत भरड, राहुल जाधव व प्रेरणा ईकारे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शेलगाव खुर्द येथील सरपंच साहेबराव इधाटे, नथ्थू  इधाटे, गोपीनाथ इधाटे, जनार्धन इधाटे, सोमनाथ इधाटे, प्रकाश इधाटे, गौतम धनेधर, दत्तू तुपे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title: Six villages selected for Unnat Bharat Scheme by Savitribai Phule Sanstha and MIT