नांदेड : एकसष्ठ हजारांचा दारूसाठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आपल्या हद्दीत कारवाई करून एका चारचाकीमधून 61 हजाराची देशी दारू अवैधरित्या विक्री करण्यासाठी जाताना जप्त करण्यात आला आहे.

नांदेड : शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आपल्या हद्दीत कारवाई करून एका चारचाकीमधून 61 हजाराची देशी दारू अवैधरित्या विक्री करण्यासाठी जाताना जप्त करण्यात आला आहे. यावेळी दोघांना अटक केली असून, आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात अवैध धंदे व अवैध दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर आहे. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपले गुन्हे शोध पथक गस्तीवर रवाना केले.

या पथकांनी आपल्या हद्दीतून एका कारमधून 61 हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. यावेळी त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुसुमताई चौकाकडून येणारी स्कार्पिओ नंबर (एम. एच. 14 डीएफ 4859) मधून देशी दारु भिंगरी संत्रा घेऊन जात असले बाबत गुप्तबातमी मिळाल्याने स्टाफसह नई आबादी मज्जित जवळ अंदाजे अकरा वाजून पंधरा मिनिटाचे सुमारास आम्ही त्यास हात दाखवून गाडी थांबवली.

गाडीची तपासणी केली असता या स्कार्पिओ गाडीमध्ये एकूण 13 खताच्या पांढऱ्या पोत्यात देशी दारू 180 एमएलच्या 1175 सीलबंद काचेच्या बाटल्या किमत अंदाजे 52 रुपये प्रमाणे एकूण किंमत 61,100 रुपये आहे. प्रितेश गोकुळ पाटील (रा. वावडदा, ता. जि. जळगाव), शिवहार संजय रागवड (रा. झरी ता. लोहा, जि. नांदेड) यांनी आपल्या स्कार्पिओ गाडीमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty one thousand liquor seized at nanded