फुलंब्री: स्वागत कमान कोसळून दोन मजूर ठार

नवनाथ इधाटे पाटील
बुधवार, 11 एप्रिल 2018

निधोण्यातील कमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर  नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, सभापती अजय शेरकर, योगेश मिसाळ, राम बनसोड, सुमित प्रधान यांनी जखमी मजुरांच्या तब्येतीची विचारपूस केले. तसेच डॉक्टरांना जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यास सांगितले.

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे बांधकाम सुरु असलेली स्वागत कमान कोसळून दोन मजूर त्याखाली तंबून ठार झाले आहे. तर सात मजूर गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (ता.दहा) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

सोनू आलाने (वय 18 वर्ष रा.परभणी), बालाजी रामभाऊ भिसे (वय 27 रा.पिंप्री ता.गंगाखेड जिल्हा परभणी) हे या अपघातात कमानीखाली दबून ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील उत्तम मोकाशे वय 22, तिरुपती सुरेश लवाटे वय 45, सागर शंकर आहेर वय 20, रामचंद्र विष्णू खोकालकर वय 35, मनोज सखाराम धने वय 30 (रा.सर्वजण पिशोर) गणेश काटकर वय 22 (रा.आनंदवाडी ता.गंगाखेड जि. परभणी) भागवत रामभाऊ भिसे वय 35 (रा.पिंप्री ता.गंगाखेड जि.परभणी) असे कमान पडून जखमी झालेल्यांचे नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील निधोंना येथे मागील तीन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वागत कमानीच्या काम सुरू होते. लोकवर्गणीतून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ठेका भागवत रामभाऊ भिसे यांना या स्वागत कमान बांधण्याचा ठेका देण्यात आला होता. या कमानीच्या बाजूच्या दोन कॉलमचे काम पूर्ण होऊन आज मंगळवारी (ता.10) रोजी कमानीवरील स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्लॅबला देण्यात आलेल्या लाकडी बल्ल्या अचानक तुटल्याने स्लॅब अचानक कोसळून त्याखाली दबून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित सात जणांना गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यामध्ये सात पैकी चार जण गंभीर झाले आहे. जखमी व मयताना फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी व त्यांचे सहकारी इरफान पठाण, अनिल सावळे यांनी तीन रुग्णवाहिकाव्दारे फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. संजय डखणे व डॉ.अजिंक्य परे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) येथे पाठविण्यात आले आहे. 

निधोण्यातील कमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर  नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, सभापती अजय शेरकर, योगेश मिसाळ, राम बनसोड, सुमित प्रधान यांनी जखमी मजुरांच्या तब्येतीची विचारपूस केले. तसेच डॉक्टरांना जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यास सांगितले.

Web Title: slab collapsed 2 dead in Fulambri