लघुउद्योगांच्या बलस्थानांची साक्ष देणारे संग्रहालय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद - लघुउद्योगांच्या खांद्यावर उभ्या राहिलेल्या औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत असलेले बळ एकाच छताखाली दिसण्यासाठी उभारण्यात आलेले संग्रहालय आता सज्ज झाले आहे. ‘मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ अर्थात मसिआतर्फे सुमारे पंचवीस लाखांची रक्‍कम खर्चून उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. सात) केले जाणार आहे. 

जगातील ऑटो इंडस्ट्रीला सुटे भाग पुरविणाऱ्या औरंगाबादच्या उद्योगांचे आणि अन्य महत्त्वपूर्ण उत्पादने एकाच छताखाली दिसण्यासाठी मसिआतर्फे एक ‘प्रॉडक्‍ट गॅलरी’ वाळूज येथे उभारण्यात आली आहे. या ‘प्रॉडक्‍ट गॅलरी’मधून (संग्रहालय) तब्बल २००० वस्तू आणि त्यांचे वाहनांतील महत्त्वही त्या उत्पादनालगत मांडण्यात आले आहे. सहा महिने प्लॅनिंगमध्ये असलेल्या या गॅलरीची दोन महिन्यांत वेगाने उभारणी करण्यात आली आहे. जर्मन एम्बॅसीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या गॅलरीचे उद्‌घाटन सोमवारी सकाळी अकराला वाळूज येथील मसिआ कार्यालयात करण्यात येणार आहे. 

ग्रंथालयात दुर्मिळ पुस्तके
मसिआ कार्यालयातील या वास्तूमध्ये औद्योगिक उत्पादनांसह औद्योगिक संशोधनाला चालना देण्यासाठी दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथालयही तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळी जागा तयार करण्यात आली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होणार असल्याचे मसिआतर्फे सांगण्यात आले.

जर्मन एम्बॅसीचे काही लोक सोमवारी शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा उद्‌घाटन सोहळा होणार आहे. ॲन्सिलरी आणि प्रॉडक्‍ट बेस उत्पादने यामध्ये दाखवण्यात येणार आहेत. 
- किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ.

औरंगाबादेतील उद्योगांनी जगभरात आपली उत्पादने पोचवली आहेत. ही ताकद एकत्रितपणे दाखवण्यासाठी हे म्युझियम उभारले आहे. ही उत्पादने ‘मेड इन औरंगाबाद, मेड फॉर वर्ल्ड’ राहणार आहेत. 
- सुनील कीर्दक, माजी अध्यक्ष, मसिआ.

Web Title: small business musium