स्मार्ट सिटीची "पीएमसी' निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाची पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) म्हणून सीएचटूएम हिल इंटरनॅशनल लिमिटेडची नियुक्ती अंतिम करण्यात आलेली आहे. ता. 15 एप्रिलपासून पीएमसीचे प्रत्यक्षात काम सुरू होईल अशी माहिती महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली 

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाची पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) म्हणून सीएचटूएम हिल इंटरनॅशनल लिमिटेडची नियुक्ती अंतिम करण्यात आलेली आहे. ता. 15 एप्रिलपासून पीएमसीचे प्रत्यक्षात काम सुरू होईल अशी माहिती महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्मार्ट सिटी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष हेतू यंत्रणा (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली. एसपीव्हीच्या पहिल्याच बैठकीत प्रकल्पाच्या एकूण कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पीएमसी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. पीएमसी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्तरांवरील तीन संस्थांनी निविदा भरल्या. या तीनही कंपन्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले होते. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एसपीव्हीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा यांच्यासोबत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर सर्व निकषांची तपासणी करून सीएचटूएम हिल इंटरनॅशनल लिमिटेडची पीएमसी म्हणून निवड जवळपास निश्‍चित झाली असून एसपीव्हीच्या मान्यतेनंतर पीएमसीचे प्रत्यक्षात काम सुरू होईल असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. 

स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून आगमी तीन वर्षांत जवळपास एक हजार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून पॅनसिटी मॉडेल अंतर्गत शहरात नागरी वाहतूक व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापन तर चिकलठाणा भागात ग्रीनफिल्ड टाउनशिप विकसित करण्यात येणार आहे. या कामांवर नियंत्रण ठेवून गुणवत्तेची तपासणी करण्याचे काम पीएमसी करणार आहे. तीन वर्षांतील कामाचा मोबदला म्हणून पीएमसीला सुमारे वीस कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: smart city pmc fixed