‘स्मार्ट सिटी’तून पडला प्रकाश

Solar-Power
Solar-Power

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड होऊन तीन वर्षे उलटली आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असतानादेखील एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. दरम्यान, गुरुवारी (ता. १३) सौर ऊर्जेचा पहिला प्रकल्प मार्गी लागला. महापालिकेच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या ८० किलो वॉटच्या प्रकल्पाचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड होऊन अडीच ते तीन वर्षे उलटली आहेत. केंद्र शासनाने दिलेले २३० कोटी रुपये पडून असून, महापालिकेने पॅन सिटी व ग्रीन फिल्ड प्रकारात सुमारे १,७०० कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले होते; मात्र हे नियोजन अद्याप कागदावरच आहे.

या प्रकल्पातील उपक्रम सौर ऊर्जेचा होता. २६ जानेवारीला पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते ५३ लाखांच्या या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली होती; मात्र नवव्या महिन्यात हे काम पूर्ण झाले आहे. गुरूवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर अनिता घोडेले, कार्यकारी अभियंता तथा प्रकल्पप्रमुख सिकंदर अली, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. डी. देशमुख यांची उपस्थिती होती. अदी ऊर्जा या एजन्सीने हे काम केले आहे.

पाणीपुरवठ्यासाठी प्रकल्प 
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालावी असा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच महापौर बंगल्यावरदेखील असा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

असा आहे प्रकल्प 
या प्रकल्पावर ५३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ८० किलोवॉट वीज महापालिकेला मिळणार आहे. रोज ४०० ते ५०० युनिट विजेची बचत होणार असून, महिन्याला सुमारे दीड लाख रुपये वाचतील, असे सिकंदर अली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com