साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; हदगाव तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

शेतावर काम करत असताना विषारी सापाने पायाला चावा घेतला. यात तरूण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरूवारी (ता. पाच) रात्री दहाच्या सुमारास रूग्णालयात मृत्यू झाला. 

नांदेड :  शेतावर काम करत असताना विषारी सापाने पायाला चावा घेतला. यात तरूण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरूवारी (ता. पाच) रात्री दहाच्या सुमारास रूग्णालयात मृत्यू झाला. 

मयत शेतकरी हा हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील होता. तो गुरूवारी सकाळी आपल्या शेतावर काम करीत असतांना त्यांच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. कामाच्या भ्रांतीत त्यांना लक्षात आले नाही. परंतु काही वेळाने शरीरात विष पसरल्याने त्यांना चक्कर येणे सुरू झाले. लगेच त्यांना नातेवाईकांनी मनाठा येथून नांदेडच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. योगेश केशव वडगावकर यांच्या माहितीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास शाम वडजे हे करीत आहेत. 

Web Title: Snake Bites Farmers Died Hadgaon Tahula Incidence