नागोबामुळे उडाली झोप!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पेट्रोलपंप बंद केल्यानंतर तेथील केबिनमध्ये झोपलेल्या कर्मचाऱ्याजवळून नागोबा मार्गस्थ झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हायरलही. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मानेजवळून नाग गेला. त्यानंतर नागाला हात लागल्याने तो जागा झाला.

सेलू - पेट्रोलपंप बंद केल्यानंतर तेथील केबिनमध्ये झोपलेल्या कर्मचाऱ्याजवळून नागोबा मार्गस्थ झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हायरलही. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मानेजवळून नाग गेला. त्यानंतर नागाला हात लागल्याने तो जागा झाला. 

नागोबाचे दर्शन होताच पाचावर धारण बसलेल्या कर्मचाऱ्याने आरडाओरड केली, तसा नागही मार्गस्थ झाला. सुदैवाने नागामुळे कर्मचाऱ्याला कसलीही इजा झालेली नाही. शहरासह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे बिळातील साप बाहेर पडत आहेत. सेलू-सातोना रस्त्यावरील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार हा मंगळवारी (ता. ३०) पहाटेचा आहे. या पंपावरील कर्मचारी बालाजी तेलमोटे हे नेहमीप्रमाणे रात्री पंपावरील केबिनमध्ये झोपले होते. पहाटे पावणेतीनच्या सुमारास नाग त्यांच्या मानेखालून गेला. त्यानंतर तेलमोटे यांचा हात नागाला लागला. त्यामुळे ते जागे झाले. त्यावेळी समोर फणा काढून बसलेला नाग त्यांना दिसला. त्यांनी आरडाओरड केली. तेवढ्यात नाग गायब झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Petrol Pump Cabin

टॅग्स