"स्नेहसावली'' देणार जगायला बळ 

सुषेन जाधव 
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद : घरातील वृद्धांना "स्नेहसावली' केअर सेंटरतर्फे 15 जूलैपासून औरंगाबादेत पॅरॉलेसिस, पार्किसन्स, कोमा, फ्रॅक्‍चर, अस्थिव्यंग, मतिमंदत्व आदि व्याधींनी अक्षम रुग्णांच्या सेवेसाठी प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यात 24 तास रुग्णांची नर्सिंग केअर, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार आहार, फिजीओथेरपी आदि सुविधा असल्याची माहिती सेंटरचे किशोर देशपांडे यांनी मंगळवारी (ता. 10) पत्रकार परिषदेत दिली. 

बहूतांश वेळेस घरातील व्यक्तींना बेड रेस्ट दिली गेली तर इतर सदस्यांना नोकरी, व्यवसायामुळे दिवसरात्र त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही. अशा वेळेस या स्नेह सावलीने "डे केअर' ही सोय केली आहे. स्नेहसावलीचे सर्व पदाधिकारी हे शहरातील प्रसिद्ध डॉक्‍टर्स असून सामाजिक बांधिलकीने हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे देशपांडे म्हणाले. या केअर सेंटरमध्ये 35 रुग्णांना दाखल करुन घेण्यात येणार असून यात स्पेशल, सेमिस्पेशल, जनरल वार्ड अशी सोय प्रतिमहिना 12 ते 25 हजार रुपयार्यंत नाममात्र शुल्कात असणार आहे. संस्थेत हव्या तितक्‍या कालावधीसाठी दाखल करुन घेतले जाते. बहूतांश वेळा घरातील सदस्यांना चार पाच दिवसांसाठी बाहेरगावी जायचे असल्यास घरातील वृद्धांना सोबत घेऊन जाणे शक्‍य होत नाही, अशा वेळेस प्रति दिन 250 रुपये शुल्क भरुन "डे केअर' चीही सोय असणार आहे. यावेळी डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. उज्ज्वला खाडे, डॉ. डॉ. अमेय पुजारी, डॉ. प्राजक्ती देशपांडे आदि उपस्थित होते. अधिक माहितीसाठी सागर ओतारी 7887800025 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

स्नेहसावली म्हणजे वृद्धाश्रम नव्हे 
स्नेहसावलीमध्ये कोणत्याही वयोगटाची व्यक्ती (तान्ह्या बाळापासून वृद्धांपर्यंत) दाखल करुन घेतली जाईल. यामध्ये केवळ आजारी (परावलंबी) व्यक्तींचाच समावेश असणार आहे. 

काय आहे सावलीत? 
स्नेहसावली ही नर्सिंग केअर सेंटर आहे, त्यामुळे कोणतेही उपचार केले जात असून केवळ शुश्रूषा केली जाते. रुग्णाला डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या, औषधे देणे, अंघोळ, स्पजिंग, वैयक्तीक, स्वच्छता, व्यायाम करुन घेण्यात येतो. सर्व सणावार साजरे केले जातील. तसेच दररोज, चहा, नाष्टा, पौष्टिक आहार आदि रुग्णांच्या आवडीनिवडीनुसार देण्यात येणार आहे. तसेच संगीत रजनी, भावगिते, भजन संध्या यासोबत रुग्णांचे वाढदिवसही साजरे केले जाणार आहेत. तिन्ही वार्डमध्ये टीव्ही, म्यूझिक यंत्रणा, वृत्तपत्रे, नियकालिके असतील

Web Title: sneha sawali gives moral support