...यामुळे मुलांच्या हालचालींवर असू द्या लक्ष

शिवचरण वावळे
शनिवार, 18 जानेवारी 2020

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांचा ‘सकाळ’शी संवाद
पालकांना दिला मुलांच्या संगोपणाबाबत सल्ला
 

नांदेड : खेळण्या बागडण्याच्या वयातील मुले अभ्यासाच्या दडपणाखाली येऊन जगभरातील १५ टक्के मुले नैराश्येच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यात मराठवाड्याचे प्रमाण सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. परंतु, हल्ली मुलांच्या अभ्यासाशिवाय बऱ्याच पालकांचे मुलांच्या बारीक हालचालींकडे लक्ष नसते. त्यामुळे मुलांमधील हा नैराश्यपणा लवकर दिसून येत नाही. जेव्हा मुले पालकांच्या विरोधात वागतात. तेव्हा या विषयाची गंभिरता पालकांना दिसू लागते, तेव्हा मात्र बराच उशिर झालेला असतो.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी मुलांच्या नैराश्याविषयी पालकांना सल्ला देताना ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले, हल्ली घरातील संवाद हरवत आहे. घरात ईनमिन तीन फारतर चार लोक राहण्याची संकृती उदयास आली, आई-वडील नोकरी - रोजगारासाठी घराबाहेर पडताच एकटी मुले टिव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या संपर्कात येताहेत. माध्यमांच्या अतिवापरामुळे अगदी लहान वयांच्या मुलांमध्ये नैराश्य आणि वैफल्यग्रस्त आणि उदासिनता वाढत आहे. मोठ्या शहराप्रमाणेच जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणची लहान मुले या समस्येच्या विखळ्यात सापडत आहेत.

हेही वाचा - Video : प्रलंबीत मागण्यांसाठी अनोखे भजन आंदोलन : कोणाचे ते वाचा

नैराश्य टाळण्यासाठी हे करा
कोवळ्या वयाच्या मुलांवर लहान सहान गोष्टींचा लवकर प्रभाव पडतो. तेव्हा पालकांनी मुलांना मनसोक्त खेळु बागडु द्यावे, त्यांच्या कलानुसार त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्यावा, जास्तवेळ मुलांना टीव्ही, मोबाईलच्या संपर्कात येऊ देऊ नये. त्यांनी केलेल्या गोष्टीचे मनापासून कौतुक करावे. वेळ मिळेल तेव्हा मुलांशी खेळण्यात किंवा बोलण्यात वेळ घालवावा.

यापासून ठेवा मुलांना दूर

हल्ली मुले टीव्ही, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले अभ्यासावर दुर्लक्ष करतात. शिवाय बघितलेल्या कार्टुन सिनेमाचा प्रभाव त्यांच्यावर लगेच पडतो. त्यामुळे कार्टुनमधील पात्रांची नक्कल करतात. या माध्यमाच्या आहारी गेलेली मुले पुढे हातात मोबाईल किंवा टिव्हीचा रिमोट नसल्यास चिडचिड करतात. त्यामुळे मुलांना मोबाईल आणि टिव्हीसारख्या माध्यमापासून दूरच ठेवले पाहिजे.

हेही वाचलेच पाहिजे - का वाढतोय ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण?

असा घ्या मानसिक स्थितीचा अंदाज
मुले जेव्हा शाळेतुन येतात. तेव्हा त्यांचे जेवणावर लक्ष असते की नाही, अभ्यास कसा आणि किती मनलावून करतात, मुलांना काय आवडते, काय आवडत नाही, मैदानावर खेळताना थकवा येतो का, घरात कुणाशी कसा वागतो, कुठल्या विषयाचा अभ्यास करणे मुलाला आवडते अशा बारिक गोष्टींवर पालकांनी लक्ष ठेवल्यास मुलांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... so focus on the movements of the children