सोशल मीडियातील अफवेतून बहुरूप्यांना बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

औरंगाबाद - परराज्यांतून चोरांची टोळी आल्याची अफवा सोशल मीडियातून जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. या अफवेतूनच शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील दोन बहुरूपी तरुणांना शहरातील पडेगाव-कासंबरीनगर येथे अडीच तास बेदम मारहाण करण्यात झाली.

विक्रमनाथ लालूनाथ (वय 38) व मोहननाथ भैरवनाथ (वय 35) अशी बेदम मारहाण झालेल्यांची नावे आहेत. दोन महिन्यांपासून ते शहरात वास्तव्यास आहेत. शहरात ते बहुरूप्याची सोंग घेत आपला चरितार्थ चालवितात. शुक्रवारी ईद असल्याने ते पडेगाव परिसरातील कासंबरीनगर येथे भिक्षुकीसाठी गेले होते. काहींनी त्यांना पैसेही दिले; पण नंतर सुमारे दोनशे ते तीनशेचा जमाव त्यांच्यावर चालून आला. चोर असल्याच्या संशयातून लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण केली. सकाळी साडेसहापासून ते नऊपर्यंत त्यांना मारहाण सुरू होती.

पोलिसांच्या वाहनांची तोडफोड
ही बाब पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. या वेळी जमावाने पोलिस वाहनांचीही तोडफोड केली. मारहाण झालेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे घाटी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: social media rumor beating crime