लातुरात सामाजिक कार्यकर्त्यांचा निघाला 'निर्भय मॉर्निंग वॉक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तुम्हाला माणूस संपवता येईल; पण विचार नव्हे. विचार मरतही नसतो, असे सांगत 'फुले, शाहु, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर' अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा आज लातूरमध्ये दिल्या. शिवाय, डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांच्या खुनामागे लपलेले सत्यही समोर आणा, अशी मागणीही करण्यात आली.

लातूर : तुम्हाला माणूस संपवता येईल; पण विचार नव्हे. विचार मरतही नसतो, असे सांगत 'फुले, शाहु, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर' अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा आज लातूरमध्ये दिल्या. शिवाय, डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांच्या खुनामागे लपलेले सत्यही समोर आणा, अशी मागणीही करण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सोमवारी (ता. 20) पाच वर्षे पूर्ण झाली. पण यादरम्यान खुनाचा योग्य त्या दिशेने तपास झाला नाही. त्यामुळे राज्यभरात निषेध आंदोलने होत आहेत. तर काही ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक' काढून सरकारला जाब विचारला जात आहे. लातूरातही निर्भय मॉर्निंग वॉक' काढून विवेकाचा आवाज बुलंद करू, अशा घोषणा देण्यात आल्या. अनेक सामाजिक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Web Title: Social workers get fearless morning walk in Latur