महापालिका स्थापनेच्या 53 वर्षांत नववी पोटनिवडणूक

solapur municipal
solapur municipal

आणखी पाच नगरसेवकांचे भवितव्य "रामभरोसे'

सोलापूर: महापालिकेच्या स्थापनेनंतर 53 व्या वर्षी यंदा 12 वी पोटनिवडणूक होत आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे (प्रभाग 14 क) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होईल. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, हरकती घेण्यात आलेल्या पाच नगरसेवकांचे भवितव्य "रामभरोसे' आहे. त्याबाबत निकाल लागला की, महापालिकेला पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

पहिली सार्वत्रिक निवडणूक 1969 मध्ये झाली. कॉंग्रेसचे नगरसेवक श्रीशैलप्पा किणगी यांचे निधन झाल्यामुळे पहिली पोटनिवडणूक झाली. 75 ते 80 या कालावधीत कॉंग्रेसचे नगरसेवक कैरमकोंडा यांची निवड तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्याने दुसरी पोटनिवडणूक झाली. 1980 ते 85 या कालावधीत प्रशासकीय कारभार होता. 1985 ते 90 या कालावधीत मुरलीधर घाडगे आणि परमेश्‍वर कोळी यांच्या निधनामुळे तिसरी पोटनिवडणूक झाली. जनता दलाचे रवी पाटील इंडिचे आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम हे शहर दक्षिणचे आमदार झाले. त्या वेळी झालेल्या चौथ्या पोटनिवडणुकीत इब्राहिम विजापुरे आणि माशप्पा विटे नगरसेवक झाले.

2007-2012 या कालावधीत शिवसेनेचे राजू भिंगारे, मीनाक्षी ज्याई आणि भाजपचे शंकरसिंग कय्यावाले यांचे सदस्यत्व अवैध जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले. त्यामुळे पाचवी पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसचे नगरसेवक जब्बार शेख यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या सहाव्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तौफिक शेख निवडून आले. भाजपचे अनंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने 2013 मध्ये आठवी पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी भाजपचे संजय कोळी निवडून आले. याच टर्ममध्ये कॉंग्रेसच्या नगरसेविका दयमंती भोसले यांचे निधन झाले. तर कॉंग्रेसचे तत्कालीन नगरसेवक महेश कोठे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने नववी पोटनिवडणूक झाली. आता होणारी पोटनिवडणूक नववी आहे.

लिकेतील पाच नगरसेवकांसंदर्भात आलेल्या हरकतीनुसार प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता त्याबाबत निकाल काय लागतो याबाबत सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. सध्या या पाचही नगरसेवकांच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे.

यामुळे झाल्या पोटनिवडणुका...

  • निधन झाल्यामुळे : 05
  • सदस्यत्व रद्द झाल्याने : 04
  • नगरसेवक आमदार झाल्याने : 01
  • जात पडताळणीमुळे : 02
  • एकाच टर्ममध्ये दोनवेळा पोटनिवडणूक : 03

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com