सौरऊर्जेचा वापर वाढला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - विजेची वारंवार होणारी लोडशेडिंग आणि वाढणाऱ्या वीजबिलांमधून मुक्ती मिळण्यासाठी राज्यात सोलार पॉवर प्लॅंटची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील साडेतीनशे ग्राहकांनी सोलरच्या पॉवर प्लॅंटच्या माध्यमाने वीजबिलाच्या त्रासातून मुक्तता करून घेतली आहे. सध्या या माध्यमातून जिल्ह्यात चार मेगावॉटची गरज भागवली जात आहे. 

औरंगाबाद - विजेची वारंवार होणारी लोडशेडिंग आणि वाढणाऱ्या वीजबिलांमधून मुक्ती मिळण्यासाठी राज्यात सोलार पॉवर प्लॅंटची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील साडेतीनशे ग्राहकांनी सोलरच्या पॉवर प्लॅंटच्या माध्यमाने वीजबिलाच्या त्रासातून मुक्तता करून घेतली आहे. सध्या या माध्यमातून जिल्ह्यात चार मेगावॉटची गरज भागवली जात आहे. 

एकट्या औरंगाबाद परिमंडळात वीज गळतीचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के आहे. वीज गळतीचे प्रमाण ज्या भागात आहे त्या भागात महावितरणला वीज तुटवड्याच्या  काळात भारनियमन करावे लागते. त्यामुळेच वाढत्या बिलांच्या आणि लोडशेडिंगमधून मुक्तता करण्यासाठी नागरिक आता सरळ सोलारचा पर्याय निवडत आहेत.

शहरामध्ये वर्षभरात ४५० घरगुती म्हणजे एलटी ग्राहकांनी सोलार पॉवर प्लॅंट बसविले आहेत, तर दहा औद्योगिक वापर अर्थात एचटी अशा एकूण जवळपास पाचशे ग्राहकांनी सोलारच्या पॉवर प्लॅंटला पसंती दिली आहे. सध्या ७० ते ९५ रुपये एक किलोवॉट या दराने सोलार पॉवर प्लॅंट उपलब्ध आहेत.

केंद्र शासनाची योजना 
सोलर सिस्टिमसाठी केंद्र शासनाची ‘सोलार रुफ टॉप’ ही योजना आहे. ऊर्जा विकास अभिकरणमार्फत (महाऊर्जा) १ ते ५०० किलोवॉट क्षमतेपर्यंत सोलार पॉवर प्लॅंट बसविता येतो. त्यासाठी केंद्र शासनाकडून एकूण खर्चाच्या तीस टक्के अनुदान मिळते. यासाठी घरगुती ग्राहकांपासून ते सोसायटी नोंदणी केलेले ग्राहक, चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मादाय रुग्णालये किंवा संस्था यांना याचा लाभ घेता येतो. यासाठी जीसीआरटी या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागते. अर्जांची छाननी झाल्यानंतर सोलार पॉवर प्लॅंटसाठी ऑनलाइनच परवानगी मिळते.  

काय करावे लागते?
साधारण सात किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या सोलारसाठी महावितरणच्या सबडिव्हिजनल कार्यालयाकडून परवानगी मिळते. त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सोलारसाठी महावितरणच्या परिमंडळकडे जावे लागते. ग्राहकाचा मंजूर भार (लोड) जितका आहे, तितक्‍याच सोलार पॉवर प्लॅंटची परवागी मिळते. बहुतांश कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सोलार एजन्सीच मदत करीत असतात. 

सोलर सिस्टिम बसवणारे ग्राहक हे नियमित वीजबल भरणारे असतात. त्यामुळे खरे तर हे महावितरणचे नुकसान आहे; मात्र पर्यावरण आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने सोलर सिस्टिमचा वापर आवश्‍यक आहे. अधिकाधिक सोलर सिस्टिमचा वापर झाला पाहिजे.  
-सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता. 

रूफ टॉप सोलर बसवल्याने मोठी बचत होणार आहे. मी दोन किलोवॉटची सोलर सिस्टिम बसवली आहे. मला दररोज दहा युनिट वीज मिळत आहे. सध्या उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढलेला आहे; मात्र वर्षभरात किमान पंधरा हजार रुपये वाचणार आहेत. प्रत्येकाने सोलर सिस्टिम बसवून सोलर पॉवरचा उपयोग घेतला पाहिजे. 
-डॉ. हसीब मोहम्मद.

Web Title: solar energy has increased