जळकोटला उभे राहिलेय सोलार घर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

जळकोट - शहरातील एका कुटुंबाने घरावर सोलार बसवून आपल्या घराला भारनियमनमुक्त केले. गावात प्रथमच सोलारचा प्रयोग केल्याने शहारातील अनेक नागरिक याची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

जळकोट - शहरातील एका कुटुंबाने घरावर सोलार बसवून आपल्या घराला भारनियमनमुक्त केले. गावात प्रथमच सोलारचा प्रयोग केल्याने शहारातील अनेक नागरिक याची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

शहरातील सूर्यकांत आबंदे यांनी गोदावरी एंटरप्रायझेसकडून सोलार पॅनेल खरेदी करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार घरावर बसविले. यासाठी त्यांना खर्च आला केवळ ३८००० हजार रुपये. यापासून निर्माण होणाऱ्या विजेवर टीव्ही, पाच फॅन, फ्रीज, कॉम्पुटर, नळाची मोटार, दहा बल्ब आदी उपकरणे चोवीस तास चालतात. आबंदे यांना याआधी दरमहा महावितरणचे एक हजार रुपये वीजबिल येत होते. वर्षाकाठी त्यांना बारा हजार रुपये भरावे लागत होते आणि भारनियमनाची कटकट होतीच. त्यामुळे श्री. आबंदे यांनी घराला सोलारयुक्त करण्याचा निर्धार केला. त्यामुळे त्यांची पैशाची बचत होऊन भारनियमनातूनही सुटका झाली. सोलार घरावर बसवून पाहिल्यानंतर त्यांचा फायदा पाहून त्यांनी आपल्या दुकानावर सोलार बसविले आहे. शहरात व तालुक्‍यात सोलार घराचा हा प्रयोग पाहण्यासाठी दररोज श्री. आबंदे यांच्या घरी नागरिक गर्दी करीत आहेत.
 

नोकरीच्या मागे न लागता चीन येथे सहा महिने जाऊन याबद्दल प्रशिक्षण घेतले आणि जळकोट शहरात हा सोलारचा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर माझ्याकडे शहर व तालुक्‍यातील अनेक नागरिक भेटण्यासाठी येत आहेत. त्यांना मी मार्गदर्शन करतो. सोलार पॅनेल ढगाळ वातावरण व पाऊस पडत असले, तरी चार्ज होण्यास काही अडचण येत नाही. शिवाय त्याची पंचवीस वर्षांची वॉरंटी आहे.
- सागर कोडगिरे, गोदावरी एन्टरप्रायझेस, जळकोट

Web Title: solar home in jalkot