सौरकृषी पंपाचे उद्दिष्ट वाढले;पण सर्व्हर डाऊनच

दिलीप गंभीरे
Saturday, 28 November 2020

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके जोमात आली आहेत. अनेक भागात शेतकऱयांना वेळेवर वीज उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्याची ही अडचण ओळखून शासनाने उद्दिष्ट वाढवून दिले. मात्र मागील चार दिवसांपासून महावितरण कंपनीचे ऑनलाइन सर्व्हर तांत्रिक कारणामुळे बंद आहे.

कळंब (उस्मानाबाद) : शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा मिळण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच विजधोरण जाहीर केले आहे. सौरकृषी पंपाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याचे अस्वशीत करण्यात आल्याने ऑनलाइन करण्यासाठी शेतकऱ्याच्या रांगा लागल्या आहेत. मात्र राज्यभरातील महावितरण कंपनीचे सर्व्हर मागच्या चार दिवसांपासून डाऊन असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
वीजपुरवठा नसताना शेतीपिकांना दिवसा गरजेवेळी पाणी देता यावे म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी पंप आणली आहे. ऑक्टोंबर महिन्यात सात हजार पाचशे सौरकृषी पंप राज्यातील शेतकऱयांना देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. शेतकऱ्यातुन सौरकृषी पंपाची मोठी मागणी वाढल्याने एक ते दोन दिवसातच उद्दिष्ट संपले. लोकप्रतिनिधीने ही बाब ठाकरे सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर शासनाने प्रत्येक वर्षी एक लाख सौर कृषी पंपाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याचे नवीन धोरण ठरविण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके जोमात आली आहेत. अनेक भागात शेतकऱयांना वेळेवर वीज उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्याची ही अडचण ओळखून शासनाने उद्दिष्ट वाढवून दिले. मात्र मागील चार दिवसांपासून महावितरण कंपनीचे ऑनलाइन सर्व्हर तांत्रिक कारणामुळे बंद आहे. मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेमधून जोडणी हवी असल्यास ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱयांच्या रांगा ऑनलाइन सेंटरवर असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हर सुरू नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. गरजू शेतकरी ऑनलाइन करण्यासाठी ऑनलाईन सेंटर जात असून सर्व्हर बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळें शेतकऱ्यांत गोंधळाचे वातावरण आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मागणी वाढली;

 पूर्वी विजतारेच्या साह्याने शेतीपंपाला विजजोडणी देण्यात आली आहे. मात्र नेमके पिकांना पाणी देतेवेळी वीजपुरवठा गुल होत असल्याने त्रासांना सामोरे जावे लागते. सौरकृषी पंप उपलब्ध झाल्यास गरजेवेळी पिकांना पाणी देणे सोपे आहे. त्यामुळे सौरकृषी पंपाची मागणी हजारोपटीने वाढली आहे.

महावितरणचे सर्व्हर डाऊन; 

मागच्या चार दिवसांपासून महावितरण कंपनीचे राज्यभरात सर्व्हर डाऊन आहे. योजनेमधून सौरकृषी पंप ऑनलाइन करण्याची प्रक्रिया केल्यास वेबसाईट ओपन होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून पिकांना पाणी न मिळाल्यास रब्बी हातून जाण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solar pump purpose increase but server down