औरंगाबाद : बीड बायपासवर बसवणार सोलार पथदिवे

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यासाठी राज्य शासनाने 386 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात आता या रस्त्यावर सोलार पथदिवे बसविण्याचा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी (ता. तीन) सांगितले.

 बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार मागणी करूनही महापालिकेतर्फे रस्त्याला दुतर्फा सर्व्हिस रोड केला जात नव्हता, तर दुसरीकडे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन केले. त्यानंतर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या पुढाकाराने सर्व्हिस रोडसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. केंद्रेकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 386 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. शनिवारी महापालिकेतर्फे मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले, की बीड बायपास रोडवर आतापर्यंत 70 ते 80 बळी गेले. औरंगाबाद ऐतिहासिक शहर असून, त्याचा आधार घेत हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला व यश आले. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना बीड बायपास रोड करणे आवश्‍यक असल्याचे पटवून दिले. त्यानुसार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड बायपास रस्त्यासाठी 386 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. हा
रस्ता हायब्रीड ऍन्युटीमधून करण्यास मंजुरी मिळाली आहे. रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा केला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी 20 मीटरचा सर्व्हिस रोड आहे. रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. रस्त्यावर सोलार पथदिवे बसविण्याचा विचार सुरू आहे. असे झाल्यास हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प ठरेल. त्यातून पाच मेगावॉटपर्यंत वीज बचत होऊ शकते, असे केंद्रेकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com