सोलर वापरूनही अडीच लाखांचे बिल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - पर्यावरणाला लाभदायक सोलर रूफ टॉप (नेट मीटरिंग) बसविल्यानंतर वीजबिल शून्य होणे अपेक्षित होते. शून्य तर सोडाच पुढची दहा वर्षेही येणार नाही एवढे म्हणजे अडीच लाख रुपयांचे बिल देऊन महावितरणने ग्राहकाला हायटेन्शन शॉक दिला. विशेष म्हणजे तक्रारी करूनही दखल नाही. अचूक बिल द्यावे, अशी साधी मागणी हतबल झालेल्या ग्राहकाने केली आहे. 

बीड बायपास येथील प्रवीण जगदीश गिरी यांनी पर्यावरणाला मदत व्हावी, या उदात्त हेतूने राहत्या घरी त्यांच्या गरजेनुसार १.५ किलोवॉट क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टीम बसविली. यासाठी २९ डिसेंबर २०१२ रोजी महावितरणसोबत करार केला. सोलरकडून घरातील विजेची गरज भागविल्यानंतर उरलेली वीज महावितरणकडे जाते. सोलरकडून महावितरणला मिळालेल्या विजेची रक्कम महावितरणने गिरी यांना परत करणे आणि गिरी यांनी जर महावितरणची वीज वापरली तर त्यांच्याकडून वीजबिल घेणे असा हा करार आहे. गिरी यांना दररोज चार ते पाच युनिट वीज लागते आणि सोलर सिस्टीम सात युनिट तयार करते. म्हणजेच दररोज दोन युनिट महावितरणकडे जाते. सोलर सिस्टीम बसविल्याने महावितरणचे बिल शून्य होऊन उलट महावितरणकडे गेलेल्या विजेचा परतावा मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती; परंतु त्यांना फेब्रुवारी २०१७ पासून सोलार नेट मीटरचे रीडिंग न घेताच सरासरी बिल दिले जात आहे. वर्षअखेर हिशेब होईल या अपेक्षेने महावितरणने दिलेले चुकीचे सरासरी बिल गिरींनी सुरवातीला भरले. त्यांना आजपर्यंत अतिरिक्त विजेचा परतावा महावितरणने दिला नाही. श्री. गिरी यांनी महावितरणच्या कार्यालयाकडे, तसेच ई-मेलवरून, ॲपवरून आणि शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवरही तक्रार केली. उलट तक्रारीनंतर पाहणी करून तब्बल दोन लाख ३६ हजार ५२० रुपयांचे बिल देण्यात आले आहे. त्यामुळे श्री. गिरी संतप्त झाले आहेत.

Web Title: solar system use electricity bill