स्फोटात भाजलेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सैनिक सचिन रावसाहेब बनकर
सैनिक सचिन रावसाहेब बनकर

नाचनवेल  (जि.औरंगाबाद ) ः सारोळा (ता. कन्नड) येथील सैनिक सचिन रावसाहेब बनकर (वय 25) यांचा फ्रीजच्या स्फोटामुळे भाजल्याने शनिवारी (ता. 12) पुण्यातील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन बनकर हे ता. 19 मार्च 2014 मध्ये बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाले होते. बेळगाव (कर्नाटक) येथे प्रशिक्षण पूर्ण करून बरेली (उत्तराखंड), दिसपूर (आसाम) व बांदीपुरा (जम्मू-काश्‍मीर) येथे सेवा बजावली. घरची बिकट परिस्थिती असताना वडिलांचे 2005 मध्ये निधन झाले.

बांदीपुरा (जम्मू-कश्‍मीर) या कर्तव्यस्थळाहून वीस दिवसांच्या सुटीवर मूळ गावी आले होते. यावेळी पंधरा दिवसांच्या सुटीत नातेवाइकांसह इतरत्र भेटीगाठी घेऊन रविवारी (ता. सहा) घरी परतले होते. जेवणाच्या अगोदर घरात पती-पत्नी असताना अचानक फ्रीजचा स्फोट होऊन दोघे पन्नास टक्‍क्‍यांवर गंभीर भाजल्याने त्यांना तत्काळ प्रथमोपचार करून पुण्यातील कमांड रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सचिन यांचा सहा दिवसांनंतर मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. सचिन यांच्यावर रविवारी (ता. 13) सकाळी नऊच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com